
फैजपुरातील नाला सफाईच्या दिखावा करून केवळ कागदपत्रांवर मुख्याधिकारी याच्या निगराणीत अजब कारभार.
राजु तडवी फैजपुर
फैजपूर येथील गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नगर परिषद तर्फे नाला सफाईच्या नावाखाली केवळ दिखावा करण्यात आला असून लाखो रूपयांचा नालेसफाईचा येथील ठेका एका ठेकेदाराला दिला होता परंतु केवळ शासनाचे लाखो रुपये वसूल करण्यासाठी हा नाला सफाई व्हावी असा दिखावा करून केवळ थातूरमातूर पद्धतीने नाला सफाई करण्यात आली असल्याचे नागरिकांनाच्या निदर्शनात आले परंतु शासनाचे लाखो रुपये वसूल करण्यासाठीहे काम करण्यात आले आहे की काय असा सवाल उपस्थित झाला आहे फैजपुरातील या नाल्याचे सांडपाणी संपूर्ण गावातून या नाल्यातून येतो मात्र थातूरमातूर दिखावा केल्यामुळे सध्या कोरोना संसर्गाच्या वाढता प्रार्दुभाव पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे फैजपूर नगरपरिषदेने गेल्या काही महिन्यांपूर्वी पंचवीस लाख रुपये खर्च करून जेसीबी आणलेला आहे परंतु नगर पालिकेच्या जेसीपीत अनेक तांत्रिक बाब उपलब्ध झाल्यामुळे जेसीबी काम करीत नसल्याचे दिसत आहे एवढे पंचवीस लाख रुपये खर्च करून जेसीबी काम करीत नाही हे नगरपरिषदेचा अजब कारभार नाहीत काय आहे असा सवाल उपस्थित झालेला आहे शहरातील नाला सफाई केवळ अर्धवट झाल्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला असल्याचे चित्र आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चौहान याच्या निगराणीत अजब कारभार सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.