आयशर टेम्पोचा ताबा सुटून टेम्पो गेला पुला खाली : अजित पवार यांनी अपघाताची घेतली माहिती

Read Time:3 Minute, 6 Second

दौंड प्रतिनिधी :-आलिम सय्यद

दौंड- पाटस राज्यमहामार्गावर भरधाव वेगाने जाणारा मालवाहतुकीचा टेम्पो भगीरथी नाल्याच्या पुलावरून थेट खाली पाण्यात कोसळल्याची घटना घडली आहे . दौंड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सुदैवाने टेम्पो चालक ( सिराज सिकंदर शेख , कुरकुंभ ता. दौंड ) हा थोडक्यात बचावला आहे . घटना स्थळावरील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार , दौंड पाटस रस्त्यावरून मालवाहतूक करणारा मोकळा टेम्पो ( MH 45-0329 ) भरधाव वेगात पाटस हुन कुरकुंभ ला चालला होता , वाहन चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील भागीरथी नाल्याच्या कठड्यावरून टेम्पो थेट खाली पाण्यात कोसळला . दोनच दिवसापूर्वी या नाल्या मधील पाणी पुढे सोडल्याने आज नाल्यात पाणी कमी होते त्यामुळे सुदैवाने टेम्पो व चालक पाण्यात बुडाले नाहीत . टेम्पो पुलावरून खाली पडल्याचे दिसताच बघ्यांची गर्दी जमली , दरम्यान अपघाताची खबर जवळच असलेल्या दौंड पोलीस स्टेशन च्या वाहतूक विभागातील पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार सुरेश चौधरी , पो . कर्मचारी अमजद शेख , अक्षय घोडके , विशाल जावळे आणि तीन होमगार्ड यांनी घटनास्थळावर धाव घेतली तेव्हा पाण्यात अर्धवट बुडालेल्या टेम्पोच्या चालकाच्या केबिन मधून चालक पोलिसांना , मला वाचवा , मला जगायचे आहे असे ओरडून सांगत होता . पोलिसांनी त्याला धीर देत आम्ही आलो आहोत तुला आता काहीही होणार नाही असा धीर दिला . व लागलीच टेम्पो बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविला लागलीच टेम्पो बाहेर काढण्यासाठी क्रन मागविला . टेम्पो पाण्यातून थोडा वर घेत आधी घाबरलेल्या चालकाला बाहेर काढले. चालकाला कसलीही मोठी दुखापत झालेली नव्हती . पोलिसांनी अपघाताची खबर टेम्पो मालकाला दिली आणि चालकाला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात पाठविले . योगायोगाने अपघातानंतर याच रस्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे जात होते त्यांनी या पुलावर थांबून पोलिसांकडून अपघाताची माहिती घेतली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!