
फैजपूर– कोरोनाचे नियम पाळून व शासनाने निगर्मीत केलेले नियम पाळून सण,उत्सव साजरे करावे.
*फैजपूर– कोरोनाचे नियम पाळून व शासनाने निगर्मीत केलेले नियम पाळून सण,उत्सव साजरे करावे असे आवाहन फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी के ले.ते फैजपूर पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठक प्रसंगी बोलत होते.*
—————————————-
*राजु तडवी फैजपुर*
यावेळी कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होणार नाही व कोणत्याही धर्माच्या भावना दुखणार नाही याची काळजी घेऊन कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून आपल्या घरी राहून बकरी ईद साजरी करावी आणि शासनाने निगर्मीत केलेले नियम पाळावे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी प्रास्तविकातून आवाहन केले.यावेळी डॉ अ जलील,जमाअत इ इस्लामी हिंद फैजपूर शाखा अध्यक्ष अबूबकर जनाब,रामा होले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर फैजपूर पालिकेचे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन इंगळे हे उपस्थित होते.तर बैठकीला काँग्रेस गटनेताकलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान,नगरसेवक रशीद तडवी,भाजपा शहर अध्यक्ष अनंता नेहेते,सातपुडा पतसंस्था व्हा चेअरमन बचंद्रशेखर चौधरी,शिवसेना तालुका उपप्रमुख अप्पा चौधरी,भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख रशिद,आर पी आय अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे,माजी नगरसेवक जफर शेख,माजी नगरसेवक डॉ इमरान शेख,जलील शेख हाजी सत्तार,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,फैजपूर एकता फाउंडेशन अध्यक्ष इरफान शेख,रईस मोमीन,शाकिरखान शब्बीरखान, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शाकिर शेख इमाम, पी आर पी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख कलिम,गोपी साळी, माजी नगरसेवक संजू रल,भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ,फयाज खान,याकूबखानआलियारखान, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष साजिद शेख,मलक आबीद,भाजपा आदिवासी सेल शहर अध्यक्ष रशिद तडवी,जाबिर कुरेशी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोपनीय पोलीस अनिल महाजन, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे,हे कॉ मालविया,
पो कॉ किरण चाटे,बाळू भोई यांनी परिश्रम घेतले.
—————————————-
*न्युज महराष्ट्र 10*
*राजु तडवी फैजपुर*