शिवसेना वकील संघटनेच्या दौंड तालुका प्रमुख पदी ॲड.दत्तात्रय पाचपुते यांची निवड..

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

दौंड तालुका शिवसेना वकील संघटनेच्या बोरीबेल येथील ॲड.दत्तात्रय पाचपुते यांची तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी निवडीचे पत्र दिले.

यावेळी पाचपुते म्हणाले की शिवसेना प्रमुख, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना विभागिय नेते खासदार संजय राऊत, विभागिय समन्वयक रविंद्र मिर्लेकर ,बारामती लोकसभा संपर्क प्रमुख सत्यवान उभे , जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी व पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचं यावेळी पाचपुते यांनी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेनेचे माऊली आहेर,शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिह चव्हाण,प्रशांत जगताप,व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!