दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी ॲड.फिरोज शेख यांची निवड

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी वासुंदे गावचे ॲड.फिरोज कमरुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी दौंड तालुका अध्यक्ष अँड उदय फडतरे- देशमुख यांनी निवडीचे पत्र दिले.

यावेळी शेख म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी आमदार रमेश थोरात, दौंड तालुका अध्यक्ष उदय फरतडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी व पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचं यावेळी शेख यांनी बोलताना सांगितले.यावेळी शेख यांच्या निवडीने वासुंदे गावातील तसेच दौंड तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी शेख यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!