वढोदा प्र.सावदा गृप ग्रामपंचयत वर वंचित बहुजन आघाडी झेंडा..

वढोदा प्र.सावदा गृप ग्रामपंचयत वर वंचित बहुजन आघाडी झेंडा

*विद्यमान संरपंच नंदकिशोर सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश..*
—————————————-
*राजू तडवी फैजपुर*

जळगाव जिल्हातील यावल तालुक्यातील रिधोरी येथिल रिधोरी,करंजी,वढोदा गृप ग्रापंचात *सरपंच नंदकिशोर सोनवणे व मा.ग्रामपंचायत सद्दस सचिन झाल्टे* यांचा वंचित बहुजन आघाडी *जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेशभाऊ इखारे* यांच्या हस्ते व *यावल तालुकाध्यक्ष मनोजभाऊ कापडे* यांच्या नेतृत्व मध्ये जाहिर प्रवेश….
आज दिनांक 07/08/2021 शनिवार रोजी दिनांक ३ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती फैजपुर येथील सभा गृह येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महाशय विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा भाषणात जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे म्हणाले की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आता पासून तयारीला लागले पाहिजे प्रत्येक गावोगावी वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता जाऊन त्या गावातील मतदारांना वंचित बहुजन आघाडी ची भूमिका पटवून दिली पाहिजे आणि प्रत्येक गावात बूथ बांधणीसाठी एक महिला व चार पुरुष एकूण पाच व्यक्ती तयार करून मतदान पक्षाला जास्तीत जास्त कसे होईल आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आणता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात विनोद भाऊ सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सद्स शमिभाताई पाटील, जिल्हा प्रवत्का ॲड. विनोदभाऊ इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष महेद्रभाऊ सुरडकर,जिल्हा उपाध्यक्ष रफिकभाई बेग, जिल्हा सचिव दिपकभाऊ मेघे, IT जिल्हा प्रमुख सचिनभाऊ बा-हे, यावल तालुकाध्यक्ष मनोजभाऊ कापडे, यावल तालुका महासचिव राजेशभाऊ गवळी,तालुका उपाध्यक्ष भगवानभाऊ मेघे, तालुका उपाध्यक्ष सागरभाऊ झाल्टे, अमोलभाऊ तायडे, शैलेद्र भाऊ वानखेडे, बाळुभाऊ तायडे, विद्याताई तायडे, सरलाताई तायडे आदी वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हातील कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्ते तर्फ सरपंच नंदकिशोरभाऊ सोनवणे स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!