महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सोबत पत्रकार संस्था फैजपूर संलग्नित

राजु तडवी फैजपुर

पत्रकार बांधवांच्या न्याय, हक्कांसाठी लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली व विविध सामाजिक उपक्रम राबवित नावलौकिक मिळविलेल्या फैजपूर येथील नोंदणीकृत पत्रकार संस्थेला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेसोबत संलग्नित करण्यात आले आहे.
दि.७ ऑगस्ट रोजी खिरोदा ता.रावेर येथे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर, आमदार शिरीष चौधरी,मा.खा.उल्हास पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सोबत पत्रकार संस्था फैजपूर ही संस्था संलग्न करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सहीचे अधिकृत पत्र पत्रकार संस्था अध्यक्ष फारुक शेख यांना देण्यात आले आहे.यावेळी फारुक शेख यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, नंदकुमार अग्रवाल,समीर तडवी,ताप्ती सातपुडा जर्नलीस्ट असोसिएशन अध्यक्ष शामकांत पाटील, दिव्य मराठी रावेर पत्रकार कृष्णा पाटील, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील,नजमोद्दीन शेख,मुबारक तडवी,साजीद शेख सावदा,अजय महाजन, देवेंद्र झोपे सर फैजपूर इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदिप गायके, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी,दिपक सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी, रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व पत्रकार संस्था फैजपूर या दोन पत्रकार संस्था यापुढे एकत्रीत काम करणार असून पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच तत्पर असल्याचे मत यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे व पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष फारुक शेख यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!