फैजपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

राजु तडवी फैजपुर

फैजपूर ( प्रतिनिधी ) – आमची संस्कृती, आमचा अभिमान,… मी आदिवासी…, माझा स्वाभिमान’ अशी परंपरा असलेली आदिवासी कला सातासमुद्रापार पोहोचली. आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात आहे. फैजपूर नगरपरिषद, फैजपूर येथे ९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक आदिवासी  दिवस म्हणून मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. नगर पालिका सभागृहात आदिवासी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या  हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा होले(टेकाम), भा.ज.पा. गटनेते मिलिंद वाघूळदे, कलिम खा मण्यार काँग्रेस गट नेते, विद्यमान नगरसेवक प्रभाकर सपकाळे, रशिद तडवी, फिरोज तडवी, चंद्रशेखर चौधरी, भा.ज.प, पत्रकार राजु तडवी, शहराध्यक्ष रशीद तडवी, वसीम तडवी, असरफ तडवी, सामाजिक कारकर्ते रवींद्र होले, हसन तडवी, रावते गुरुजी, आसेम अध्यक्ष राजू तडवी आदिवासी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!