
बाबासाहेबांची चळवळ वामनदादा कर्डक यांनी घराघरात नेली..
शेवगाव बाबासाहेब धस
====================
वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली असे उद्गार जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांनी काढले
वामनदादा कर्डक यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरुन बोलत होते याप्रसंगी विजय हुसळे यांनी ही वामन दादांचा जीवनपट उलगडून सांगितला समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय, सांगा या वेडीला या गीतांचा ठेका धरून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी प्रमुख पाहुणे अरुण घाडगे,चंद्रकांत कर्डक सर, संजय नांगरे, किशोर तुपविहिरे यांचीही भाषणे झाली
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे शेवगाव तालुका व शहर शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कैलास तिजोरे राजू चित्ते विलास निकाळजे संजय गंगावणे संगीता घाडगे रंजना हुसळे मनीषा धस अशोक शिंदे अभिजीत आव्हाड आश्रू गायकवाड संदीप घाडगे सुरेश घोक्षे बाळासाहेब भोसले शहादेव नीळ पत्रकार विजयकुमार लड्डा माजी सरपंच कुंडलीक घुगे इत्यादी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन दळवी प्रदीप पटवेकर सागर इंगळे प्रियंका तिजोरे साक्षी मगर प्रतिक्षा बळीद रमा सोनवणे यांनी परिश्रम घेतले सुरुवातीस अरुण घाडगे व सहकाऱ्यांनी वामनदादांची गीते सादर करून उपस्थितांमध्ये आनंदमय वातावरण तयार केले प्रस्ताविक संतोष पटवेकर यांनी केले तर बाळासाहेब धस यांनी आभार मानले