
कळस इंदापूर येथे आंतरपीक घेऊन लाखोंचे उत्पन्न या प्रयोगाबाबत मयुरी ससाणे हिने घेतली माहिती..
प्रतिनिधी :-आलिम सय्यद, दौंड-पुणे
निसर्गाच्या लहरीपणापुढे अनेकांनी हात टेकले. कर्जबाजारीपणातून अनेक शेतकरी अडचणीत येत आहे. अशा विपरीत परिस्तिथीत परंपरागत शेतीला फाटा देऊन इंदापूर तालुक्यातील कळस येथील धनंजय मोहोळकर यांनी ४० गुंठे शेतात गुलाबाची लागवड केली. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे गुलाबाच्या फुलांची मांगणी कमी झाल्यामुळे त्यांनी पेरू आणि मिरची या आंतर पीक घेऊन उत्पन्नाचा आणखी एक मार्ग खुला केला. मोहोळकर यांनी ४० गुंठे शेतात ५ मीटर अंतरावर डिवाईन ( Divine ) जातीच्या १४०० गुलाबाच्या रोपांची लागवड केली. तसेच १० मी अंतरावर पेरूची ६०० रोपे आणि दोन गुलाबामध्ये एक मिरचीचे रोप लावले.
बाजारपेठेचा उत्तम अभ्यास , विक्रीचे कुशल तंत्र आणि त्यासाठी लागवडीचे चोख व्यवस्थापन यावून दर्जेदार बागच नव्हे तर यश देखिल फुलवले आहे. ४० गुंठे शेतातून त्यांनी व्यवस्थापन व मजुरी खर्च वगळता गुलाबाचे तीन लाख, पेरूचे दिड लाख आणि मिरचीचे तीस हजार, असे सुमारे पाच लाख रूपयांचे वार्षिक उत्पन्न मिळविले .
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी , कृषी महाविद्यालय पुणे च्या ग्रामिण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१-२०२२ अंतर्गत कृषिकन्या कु. मयुरी दिलीप ससाणे हिने इंदापूर तालुक्यातील कळस येथील शेतकरी धनंजय मोहोळकर यांनी शेतीत केलेल्या प्रयोगाची माहिती घेतली याबाबत मयुरी ससाणे हिला डॉ . पल्लवी सुर्यवंशी , डॉ . सी .टी कुंभार डॉ. सोनावणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.