उमती फाउंडेशन व न्यू लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर

श्रीरामपूर

वार्ड नंबर 2, अँग्लो उर्दू हायस्कूल येथे गरजू व गरीब नागरिकांसाठी सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते, सदर शिबिरा करिता हृदयरोग तज्ञ डॉक्टर गौरव वर्मा तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मरियम अब्दुल माजिद व फॅमिली फिजिशियन डॉक्टर उज्वल कुमार धुमाळ तसेच बाल रोग तज्ञ डॉक्टर विवेक राऊत व फॅमिली फिजिशियन डॉक्टर शोएब शेख आणि,डॉ,वसीम यांच्या उपस्तीती मधे शिबिर संपन्न झाले .आज च्य शिबिरामध्ये जवळ जवळ चारशे रुग्णांनी लाभ घेतला .सदर शिबिरासाठी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी “उंमती फाउंडेशन “यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शिबिराची सुरुवात मुक्ती रिजवान यांच्या प्रार्थनेने झाली सदर शिबिराचे अध्यक्षस्थान श्रीरामपूर चे माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भुषविले होते तर शिबिरासाठी श्रीरामपूरच्या माननीय नगराध्यक्ष अनुराधाताई यादेखील हजर होत्या तसेच वरील शिबिरासाठी विशेष करून नगरसेवक मुक्तार भाई शहा , नगरसेवक कलीम भाई कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते व एडवोकेट जयंत चौधरी,अहमद भाई जागीरदार ,साजिद मिर्झा, सैफ भाई, शाहीद भाई ,तोफिक शेख , शंनो दारूवाला हे देखील हजर होते. सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उंमती फाउंडेशन ग्रुपचे डॉक्टर तोफिक शेख,फिरोज जनाब, शाकीब भाई शेख,युसूफ लाखनी उममती चे लीगल आडव।इझर एडवोकेट आरिफ शेख, माजिद मिर्झा ,समीर शेख SS ,मोसिन बागवान, नितीन बनकर ,आतिक सय्यद, मोहसीन शेख, अफसर शेख ,अन्वर तांबोळी
Rसोहेल,तसेच न्यू लाईफ केअर चे अस्लम भाई यांनी विशेष परिश्रम घेतले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट आरिफ शेख यांनी केले तर उममतीअध्यक्ष सोहेल भाई दारूवाला यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!