पुणे-शिरुर दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम संथगतीने…

वाहतुकीची कोंडी तर चालका सह ग्रामस्थ त्रस्त.

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी (विनायक साबळे)
आज शनिवार दिनांक 21 दुपारपासून लोणीकंद, पेरणे फाटा तालुका हवेली, कोरेगाव भीमा,सणसवाडी तालुका शिरूर दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती, महामार्गावर  वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर  मोठ्या रांगा लावल्या होत्या, सायंकाळी उशिरापर्यंत लोकांना प्रवासात  त्रास सहन करावा लागला, संबंधित महामार्ग  वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग समजला जातो, पुणे नगर औरंगाबाद, जोडल्या जाणाऱ्या तसेच कोरेगाव-भीमा पासून रांजणगाव पर्यंत असणारे औद्योगिक क्षेत्रांमधील कामगारांच्या बसेस, इतर मालवाहतूक गाड्या त्यांची सतत गर्दी असते, महामार्गाचे रुंदीकरण अतिशय धीम्या गतीने चालल्याने इतर काही कारणाने गेल्या   आठवडाभरापासून वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे तासन्तास लागलेल्या वाहनांच्या रांगा मुळे लोकांमध्ये, प्रवाशांमध्ये नाहक  त्रास , व नाराजी व्यक्त होत आहे, संबंधित खात्याने तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी यावर विचार करून,हि  वाहतुकीची कोंडी  सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे, पेरणे फाटा तसेच कोरेगाव भीमा, सणसवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतः चौका मधील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले,

गेल्या अनेक महिन्यांपासून वाघोली  पासून पुणे रांजणगाव पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने चालेले  आहे, दोन्ही बाजूनी मातीचे ढिगारे, खोल साईड पट्ट्या, यामुळे छोटे-मोठे अपघात, वाहतुकीची कोंडी याला ग्रामस्थ,नागरिकांना, प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे, ॲम्बुलन्स देखील तासन तास अडकत आहे खूप वाईट परिस्थिती येथे पहावयास मिळत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!