विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येचे आगमण..

‌‌‌‌ शेख युनुस‌ (प्रतिनिधीं) राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे लोकनेते डां बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येचे आगमण झाले आहे ‌.येथील परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी कन्येचे स्वागत केले आहे.संस्थेचे कृषी शिक्षण संचालक भारत घोघरे,प्राचार्य निलेश वले,कार्यक्रम समन्वयक प्राचार्य रमेश जाधव, प्रा.प्रियंका दिघे,यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी ऋतुजा सुरेश हया शेतकऱ्यांचे अनुभव जाणून, त्यांना मार्गदर्शन करणार आहे. दहा आठवडयातील कालावधीत शेतीतील माती परिक्षण, फळबाग लावगड,आत्मिक किड,रोग व्यवस्थापन,बीज प्रक्रिया ,शेतातील अवजरांचा वापर,शेतीचे आर्थिकदृष्टय़ा नियोजन, आणि जनावरांचे लसीकरण, या आदीबाबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असुन आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीचे काम करणार आहे. यावेळीं पठारे गोरक्ष तुकाराम हे शेतकरी कुटूंबासह उपस्थीत होते. कृषी कन्या ऋतुजा हिचे राहुरी तालुक्यात ,लोणी पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!