काल राहुरी तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा वेळेत मिळाव्या, नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी काही विषयांचा आढावा घेतला. नवीन रेशन कार्ड मिळणे, रेशन कार्ड विभक्त करणे, रेशन कार्डात नवीन नाव समाविष्ट करणे आदी सेवा नागरिकांना ठराविक मुदतीतच मिळायला हव्यात अशा सुचना तहसीलदारांना दिल्या.
या संबंधातील काही नोंदवह्या मला अपूर्ण आढळून आल्या. पुढील खेपेस हे खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी संबंधितांना दिली. सर्वसामान्य नागरिकांना या सर्व सुविधा कोणत्याही पुढाऱ्याच्या वशिल्याशिवाय अथवा कोणालाही चिरीमिरी दिल्याशिवाय वेळेतच मिळायल्या हव्या हे मी कटाक्षानं बघणार आहे.
*प्राजक्त तनपुरे*
राज्यमंत्री
