मुसळवाडी पाणीपुरवठा योजना व अधिका-यांची गुगली उघड – आमदार लहू कानडे

इम्रान शेख श्रीरामपूर

मुसळवाडी व इतर 9 गावांच्या नादुरुस्त पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आमदार लहू कानडे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये उपस्थित केला होता. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जिल्हा आराखड्यामध्ये सदरच्या योजना दुरुस्तीसाठी त्यावेळेस 8 कोटी रुपयांची तरतुद होती, परंतु महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण्याच्या अधिका-यांना ही बाब माहितच नसल्याची किंवा सदरची योजना दुरुस्त करण्याची अजिबात भान नसल्याचे त्या बैठकीमध्ये उघड झाले होते. तथापि आमदार लहू कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सर्वहे करुन अंदाजपत्रक तयार करण्याचे नाटक केले. परंतु तत्कालीन का.अ. श्री. सराफ यांच्या मनाविरुध्द सदरची घटना घडत असल्याने मुख्य रायझींग मेन व फिल्टर प्लॅन्ट नव्याने दुरुस्त करण्याऐवजी त्यांनी थातुरमातुर दुरुस्त्या सुचविल्या वास्तविक योजनेमध्ये समाविष्ट सर्व गावांना पाणी पोहचत नाही कारण मुख्य पाइपलाइन सदोष आहे तेथे चांगल्या दर्जाचे पाइप टाकून नवीन व्हॉल्व बसवणे आवश्यक आहे. तसेच मुसळवाडी तलावातून मिळणारे पाणी तलावात उगवलेल्या वनस्पतीमुळे व शेवाळामुळे दुर्गंधीयुक्त होते त्यासाठी योजनेला नवा फिल्टर प्लॅन्ट आवश्यक आहे. याव्यतिरिक्त तलावातील वनस्पतींचा नायनाट करुन पुन्हा त्या उगवू नयेत म्हणून तेथे आवश्यक त्या सुधारणा करणेही गरजेचे आहे. असे असतांना म.जी.प्रा. च्या अधीक्षक अभियंत्यांनी सदरची कामे करण्याचे नाकारले. कारण त्यांच्याच अधिका-यांनी सदरची योजना केलेली असल्याने ती एवढ्या लवकर नादुरुस्त झाल्यामुळे त्यांच्याच चौकश्या लागण्याची शक्यता होती. आणि कार्यकारी अभियंता सराफ यांनी करतो करतो म्हणत सेवानिवृत्त होइपर्यंत लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवले. सदरची बाब लक्षात येताच आमदार लहू कानडे यांनी सर्व अधिका-यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आता जुना आराखडा रद्द झाला असून जलजीवन मिशन मधून सर्व घरांना नळ कनेक्शन देऊयात व त्यासाठी सदरच्या योजनेच्या विस्तारीकरणाचा भलताच आराखडा या विभागाने केला. मुळात जोपर्यंत सर्व गावांना पाणी पोहचणार नाही तोपर्यंत पुन्हा हा नव्याने होणारा खर्चही वाया जाणार होता. म्हणून आमदार लहू कानडे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दि. 8 मार्च 2021 रोजी त्यांना सविस्तर लेखी पत्र दिले व या सर्व संबंधित अधिका-यांची चौकशी करुन योजना असूनही पाण्यापासून वंचित असणा-या 10 गावांच्या पाण्याचा प्रशन सोडवावा अशी विनंती केली. त्यानुसार पाणीपुरवठा मंतत्रयांनी संबंधीत अधिका-यांना लेखी सुचना देऊन अधिकारी म्हणतील त्या पध्दतीने नव्हे तर सर्व गावांच्या ग्रामसभा घेऊन गावकरी म्हणतील त्या पध्दतीने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करुन ताबडतोब शासनाला सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सदरच्या योजनेमध्ये समाविष्ट असणा-या सर्व गावच्या सरपंचांची / ग्रामसेवकांची बैठक गटविकास अधिकारी राहुरी यांनी दि. 7/4/2021 रोजी बोलावली आहे. सदरच्या बैठकीला म.जी.प्रा. सर्व अधिकारीही उसथीत राहणार आहेत. आमदार लहू कानडे यांनी सदरची बैठक मुसळवाडी येथेच घ्यावी अशी सुचना केली आहे. अशा प्रकारे आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नाने मुसळवाडी व इतर 9 गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!