रोपवाटिका अर्थात नर्सरी च्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा..

अहमदनगर प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन.

आजच्या घडीला शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांना न परवडणारा झालेला आहे,तरीही पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती वाचून दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही.शेतकरी फळबाग लावण्याकडे वळला आहे, परंतु रोपवाटिका अर्थात नर्सरी च्या माध्यमातून अवास्तव किमतीमध्ये शेतकऱ्यांना फळांच्या झाडांच्या रोपाची विक्री केली जाते. याबाबत शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे अनेक निवेदने दिली त्याची दखल म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते संतोष जी पवार आणि ह भ प अजय महाराज बारस्कर तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले आणि जिल्हा संघटक नितीन जी पानसरे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले.अशा अवास्तव किमतीत रोप विक्री करणाऱ्या नर्सरी वर आपले अधिकाराखाली कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच रोपांचे दर पत्रक रोपवाटिकेच्या दर्शनी भागात लावण्यात यावे. अन्यथा प्रहारच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!