तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे स्फोट,अग्नितांडव व कामगारांच्या मृत्यु बाबत पँथर आक्रमक..

डहाणू प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे

साकिनाका बलात्कार प्रकरणात दलित पँथरचा आंदोलनाचा इशारा

देशातील प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांच्या क्रमवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्र ९३.६९ प्रदूषण निर्देशांकास पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक शहरांच्या यादीतील १०० शहरांमध्ये तारापूरचा आग्रकम लागतो. तारापूर औदयोगिक क्षेत्र हे तीव्र प्रदूषित क्षेत्र असून येथील रहिवाशांना प्रदूषणाचे गंभीर परिणामांना तसेच गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. उद्योगांमधील बॉयलरसाठी वापरला जाणारा अत्यंत निकृष्ट दर्जाचा कोळसा त्यातून निर्माण होणारे वायू व जल प्रदूषण , hazardous रसायन बनवणे व वेगवेगळ्या प्रकारचे (chemicals reaction) केमिकल्स मिक्सिंग करणे परंतु रासायनिक प्रक्रिया करताना व उत्पादन घेताना प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त सुविधांचा अभाव असणे , प्रक्रिया न करता रसायनयुक्त पाणी सरळ गटारात सोडणे , स्पेस मार्जिंगचा प्रश्न , मोठयाप्रमाणात अनधिकृत बेकायदेशीर व वाढीव बांधकामांचे निर्माण ,कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रचंड अभाव ,अग्निरोधक उपकरणांची अपुरी व्यवस्था ,कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचे प्रकार , असुरक्षित पद्धतीने विद्युत उपकरणांची मांडणी परिणामी जल व वायु प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन तसेच गॅस गळती व रिॲक्टरचा स्फोट होऊन वारंवार आग लागून अपघात घडत असल्याने मोठ्या प्रमाणात कामगारांना हकनाक आपले जीव गमवावे लागत आहे. तारापूर
औद्योगिक क्षेत्रातील T, N , E , M ,L ,D ,J , W ,K ,F या औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट मध्ये तसेच प्रामुख्याने विराज समूहातील कारखान्यातून मोठया प्रमाणात प्रदूषण केले जात असून, सदर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट हे मौजे पाम , शिवाजी नगर , सालवड, पास्थळ, सारवली , कुंभवली , गुंदवली, कोळवडे , अवधनगर , यशवंत सृष्टी या गावांना तसेच बोईसर, चित्रालया शहरांच्या लगत असून, हप्त्याभरात जखारीया लिमिटेड व रंगरसायन या औद्योगिक क्षेत्रातील दोन कंपन्यांमध्ये भीषण आग व स्फोट होऊन जखारीया कारखान्यातील दोन कामगारांना आपले जीव गमवावे लागले आहे. तर काही कामगार रुग्णालयात उपचार घेत असून परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. परंतु महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , प्रदूषण नियंत्रण मंडळ व सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनाय, वसई तसेच संबंधित ग्रामपंचायत व संबंधीत विभाग यांच्या बकाल कार्यव्यवस्था व कार्यपद्धती , कारवाई करण्यात कसूरता , कारखान्यांवर नियंत्रणाचा अभाव परिणामी तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार अपघात घडत असल्याने एखाद्या दिवशी भोपाळ सारखा महाभयानक अपघात घडून औद्योगिक परिसरा लगत असलेल्या गावांतील लाखो नागरिकांना आपले जीव गमवावे लागेल यात शंका नाही.वारंवार होणाऱ्या अपघात व संबंधित विभागाकडून तुटपुंज कारवाई करण्यात येत असल्यानेच प्रदूषणात व अपघातात प्रचंड वाढ होत आहे. करिता मोठ्या प्रमाणात प्रदूषण करून नागरिकांच्या, कामगारांच्या जीवनाशी खेळणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना व त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मुंबई साकिनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्याचा संतापजनक प्रकार घडला असून, या घटनेने संबंध देशात असंतोष व नागरिकांच्या भावना अतितीव्र आहेत. व पुन्हा एकदा राज्यात महिलांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सदर कृत्य अमानुष व अत्यंत पाशवी वृत्तीचे दर्शक आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधित आरोपींवर जलदगतीने न्यायालयात खटला चालवून आरोपीना कठोरातील कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा दलित पँथरच्या वतीने राज्यात उग्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार व संबंधित विभागांची राहील अश्या आशयाचे निवेदन पालघर उपजिल्हाधिकारी महाजन साहेब द्वारा राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना शीघ्र कारवाई बाबत देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत ,युवा जिल्हा अध्यक्ष ॲड. अजिंक्य म्हस्के , विशाल मोहने , तालुका प्रमुख सल्लागार अली हसन , अब्बास वाडीवाला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!