
पोषण आणि आहार जागृतीबाबत महिलांची भूमिका महत्वाची – काकासाहेब शिंदे
भारत देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या अनुषंगाने भारत सरकारने जनहिताच्या दृष्टीने विविध महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘सप्टेंबर’ हा महिना “पोषण महिना” म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा केला जात आहे. श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी पोषण अभियान २०२१ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्थ काकासाहेब शिंदे यांनी पोषण आणि आहार जागृतीबाबत महिलांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. महिलांमध्ये जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि ते आजार होऊ नये म्हणून, संतुलित आहार कसा असावा याविषयी डॉ. तेजश्रीताई लंघे जिल्हा परिषद सदस्या यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आपला आहार पोषक व्हावा, संतुलित व्हावा याकरता सद्य दैनंदिन आहारमध्ये काय बदल केले पाहिजे याविषयी डॉ. सुमित श्रावणे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगाव-ने यांनी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांनी पोषक परसबागेची जोपासना करावी असे आवाहन प्रभारी प्रमुख माणिक लाखे यांनी केले. केव्हीके चे शास्त्रज्ञ इंजि. राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, सन २०१८ पासून सुरु झालेले पोषण अभियान आणि या वर्षीच्या पोषण अभियानाचा विषय ‘पोषक धान्य’ याविषयीमाहिती सांगितली. इफको कंपनीचे मुख्य व्यवस्थापक डी. बी. देसाई यांनी इफको कंपनी शेतकऱ्याना खताच्या बॅग सोबत विमा देत असलेच्या धोरणाची माहिती उपस्थितांना दिली. महिलांचे पोषण हे तर महत्वाचे आहे, परंतु महिला सशक्तीकारणासाठी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी व शेतात पिकवलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव कसा मिळवून देता येईल याविषयी डॉ. भारत करडक, संचालक नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे यांनी उपस्थित शेतकरी व महिलांना मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने आणि कृषि विभाग यांच्या माध्यमातून महिलांसाठी होत असलेल्या कार्याची माहिती मंडल कृषि अधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.
सदर कार्यक्रमादरम्यान केव्हीके आणि इफको कंपनीच्या वतीने उपस्थित शेतकरी पुरुष व महिलांना परसबागेतील पोषण वाटीकेसाठी बियाणे संग्रह पाकिटे व फळझाड रोपे मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच केव्हीके दहिगाव-ने प्रक्षेत्रावर व शेतकऱ्याच्या शेतावर मान्यवर व शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कृषिकन्या व महिलांना पोषक धान्य आधारित भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला समाज विकास समितीचे अशोक गायकवाड तसेच केव्हीके चे शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे, डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, अनिल देशमुख, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे, गणेश घुले, संजय कुसळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रासंचालन केव्हीके चे शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी केले तर आभार नारायण निबे यांनी मानले.