मळद गावातील भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे ब्युरो :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील मळद गावातील भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय .

मळद येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे , माजी आमदार रमेश थोरात , दौंड शुगर कारखान्याचे जेष्ठ संचालक व पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या विचारांवर व कार्यप्रणाली वर पक्षाचे ध्येय धोरणांवर तसेच कामाची कार्य पाहून तालुक्यातील सत्ताधारी भाजपाच्या बहुसंख्य तरुणांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय सदरचा प्रवेश वीरधवल बाबा जगदाळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून यामध्ये मळद येथील तरुण मल्हारी खटके,पोपट घागरे,भाऊ खटके,भरत घागरे,महेश घागरे, दत्तात्रय खटके, सचिन घागरे , आदित्य कुंडलिक घागरे, संतोष घागरे, हनुमंत घागरे, अजय घागरे,
अशा अनेक तरुणांचा प्रवेश यावेळी जगदाळे यांच्या उपस्तिथ झाला यावेळी जगदाळे यांनी सांगितले की येणाऱ्या काळात आपल्या काही कामाच्या अडीअडचणी असल्यास आम्ही कायमच सोडवण्यास कटिबद्ध राहून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे ठाम आश्वसन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!