शौचालयाची टाकीमध्ये पडून एकाचा मृत्यू तीन जण गंभीर..

Read Time:3 Minute, 46 Second

कोरेगाव भीमा(विनायक साबळे )

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा  येथील नरेंद्र नगर मधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये शौचालयाची टाकी साफ करताना टाकी मध्ये पडून शुभम ईश्वर आचार्य या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून तिघा जणांना खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असल्याची दुर्दैवी घटना घडली  आहे.
नरेंद्र नगर मधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये वसंत गव्हाणे यांच्या घराच्या शौचालयाची टाकीची साफसफाई करत असताना अचानक एक कर्मचारी शौचालयाची टाकी मध्ये पडला, यावेळी त्याला वाचविण्याचा प्रयत्नात इतर कर्मचारी शौचालयाची टाकी मध्ये पडल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली यावेळी शेजारील नागरिक या ठिकाणी मदतीसाठी धावून आले तर घटनेची माहिती मिळताच शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक संतोष पवार, होमगार्ड गणेश भंडारे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी परिसरातील नागरिकांनी घडलेल्या घटने आपल्या पद्धतीने टाकी मध्ये पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, दरम्यान याचवेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशामक पथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले, यावेळी अग्निशामक दलाचे ऑफिसर विजय महाजन, नितीन माने, महेश पाटील, ओमकार पाटील, तेजस डोंगरे, उमेश फाळके, प्रशांत अडसूळ, अक्षय बागल यांनी त्या ठिकाणी आपले मदतकार्य सुरू केले याकामी अनिल कशीद ,दीपक गव्हाणे, संपत गव्हाणे अविनाश गव्हाणे व ग्रामपंचायत कर्मचारी बच्चन यांची मदत मिळाली.दरम्यान चौघांना टाकीच्या बाहेर काढण्यात आले, यावेळी सदर टाकीमध्ये पडलेल्या दशरथ देवराम गव्हाणे, विकी नंदू दरेकर, धरमसिंग परदेशी व शुभम ईश्वर आचार्य यांना शौचालयाची टाकीतून बाहेर काढत उपचारासाठी वाघोली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, या घटनेमध्ये शुभम ईश्वर आचार्य (वय २३ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) या युवकाचा मृत्यू झाला असून दशरथ देवराम गव्हाणे( वय ४० वर्षे), विकी नंदू दरेकर( वय २४ वर्षे), धरमसिंग परदेशी( वय ३५ वर्षे सर्व रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. आता अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेक नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!