मनमाड- सांगली राज्य महामार्गाच्या कामाबाबत भागवतवस्ती येथील नागरिकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी…

पुणे ब्युरोचीफ :- आलिम सय्यद

मनमाड – सांगली राज्य महामार्ग हा दौंड तालुक्यातून भागवतवस्ती येथून गेला असून भागवत वस्ती येथील मनमाड ते सांगली राज्य महामार्गाचे काम चालु असून येथील नागरिकांनी या रस्त्याचे कामाला अडथळा न आणता येथील रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी कुरकुंभ ग्रामपंचायत लिंगाळी, गोपाळवाडी या तिन्ही ग्रामपंचायतींना पत्र देउन यांच्या ज्या काही ग्रामस्थांच्या मागण्या असून याची व्यथा यापर्वी मांडलेली असून त्याचे पत्र येथील नागरिकांनी महामार्गाच्या अधिकारी यांना दिलेली आहे . येथील नागरिकांनी याबाबत संबंधितांना स्ट्रेटलाईट करून देणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेज लाईन करून देणे, व दोन्ही बाजूला फुटपाथ बनवून देणे अश्या या ग्रामस्थांची मांगणी असून ज्या वेळेस काम चालु करण्याचे ठरले होते , त्यावेळेस संबंधीत अधिकाऱ्यांनी येथील रहिवासी, ग्रामस्थांना येथील मांगणी केलेली सर्व काम करुन देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे येथील नागरिकांनी या कामाला काम करण्यास परवानगी दिली होती . तरी पण आता सध्या तरी रोड चे काम ७५ % झालेले असून या रस्त्याला भली मोठी उंची असल्याने बाजूला असणाऱ्या शेतकरी यांना शेतात जाण्यास रास्ता देखील या संबंधित ठेकेदार, अधिकारी यांनी ठेवलेला नसून तो मार्ग देखील मोकळा करावा अशी देखील या शेतकऱ्यांची मांगणी आहे . सदर अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या कोणत्याही प्रकारे पुर्ण केलेल्या नाहित , त्यामुळे आम्हाला दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे . तरीही सर्व संबंधीत अधिकाऱ्यांशी कामाच्या साईडवर चर्चा केली असता आम्हा ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत . सदर चे काम न केल्याने त्यामुळे आम्ही रोडच्या कामास स्थगीती देत असून होणाऱ्या परिणामास सदर अधिकारी जबाबदार राहतील.तसेच सदर राहिलेले उर्वरित रोडचे काम आमच्या ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण करुनच राहिलेले काम उर्वरित काम चालु करण्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही .असे मांगणी , विनंती पत्र यावेळी येथील नागरिकांनी दौंड चे आमदार, बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार , तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, व दौंड पोलीस स्टेशन, यांना याबाबत मांगणी पत्र दिलेले आहे.
संबंधित कामाबाबत संबंधित महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ऐ. बी. देवकाते यांना विचारले असता संबंधितांच्या कामाची पुरतात करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत सांबांधितांनी आम्हाला काम करण्यास परवानगी द्यावी आम्ही ते करू असे यावेळी ग्रामस्थांना तोंडी आश्वासन देवकाते यांनी दिले.

या रस्त्याच्या कामाला आमचा कसलाही विरोध नाही परंतु आमच्या काही मांगण्या आहेत त्यांनी आम्हाला लेखी पत्र देऊन पूर्ण कराव्या .भागवतवस्ती ही तीन ग्रामपंचायत मध्ये येत असून आमची अवस्था ना घर का ना घाट अशी झाली आहे .तरी आमच्या मांगणी संबंधित विभागाने पूर्ण कराव्या

दिलीप भागवत
ग्रामस्थ भागवतवस्ती

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!