
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कर्जत त्रैवार्षिक अधिवेशन कर्जत किरवली येथे संपन्न..
कर्जत:- संजय कदम प्रतिनिधी
दिनांक २१ सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती त्रैवार्षिक अधिवेशन होऊन महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्जत तालुका नविन कमिटीची स्थापना करण्यात आली. सर्वप्रथम किशोर पाटील सर यांनी सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री जगदीश ऐनकर सर व त्यांचे सहकारी यांनी सुमधुर आवाजात ईशस्तवन, स्वागतगीत व जय जय महाराष्ट्र माझा हे वीर संचारणारे गीत सादर केले. तदनंतर परशुराम म्हात्रे सर यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यावरून समितीचे जिल्हा सचिव नागोठकर सर, तर निरीक्षक म्हणून भालेकर सर, गायकर सर, येळवे सर, पवार सर व अन्य मान्यवर सभासद उपस्थित होते. संदीप भोईर सर, साळवी सर, यांसह तालुक्यातील केंद्रप्रमुख अंकुश पाटील साहेब, अरुण पारधी साहेब, शरद म्हसे साहेब, दरवडा साहेब व श्रीमती नलिनी साळोखे मॅडमविशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शिक्षक समिती कर्जत यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष शायलिक जामघरे सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यमान अध्यक्ष गवारी सर व त्यांची संपूर्ण टीमचा सन्मान करण्यात आला. विविध ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे शिक्षक समितीचे सदस्य यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये समीर येरुणकर सर, विजय पवार सर, ब्रिजेश भालेकर सर, आढारी सर, जुईकर सर, नलिनी साळोखे मॅडम, पाशिलकर मॅडम, रवी काजळे सर यांचा समावेश होता. जिल्हा सरचिटणीस नागोठकर सर यांनी कर्जत तालुका नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा केली. सोबतच नवीन कार्यकारणीस नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष समीर तानाजी येरुणकर सर, सचिव मारुती येंदे सर, सहसचिव आशिष उंबरे सर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दत्तू बुरुड सर, सहकार्याध्यक्ष मच्छिंद्र रढे सर , संजय पानपाटील सर, सहकोषाध्यक्ष वसंत ढोले सर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण सुपे सर, बाळू बुरुड सर, खजिनदार हरिश्चंद्र शिंदे सर सहखजिनदार रवि काजळे सर तालुका संघटक ईश्वर इंगळे सर, संजय मिनमीने सर, वराडकर सर, दिलीप गोतारणे सर व हरिश्चंद्र लोहकरे सर प्रसिद्धीप्रमुख संतोष मगर सर व नितीन थोरात सर कार्यालयीन चिटणीस धनाजी देसले सर सल्लागार शरद म्हसे साहेब, दरवडा साहेब, अरुण पारधी साहेब, अंकुश पाटील साहेब, खाकर सर,सोबतच यावर्षी संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार महिला कार्यकारिणी ची स्थापना करण्यात आली. राज्यात सर्वप्रथम महिला कार्यकारिणी स्थापन करण्याचा मान अर्थात कर्जत शाखेला मिळाला. महिला कार्यकारिणी पुढीलप्रमाणे महिला आघाडी प्रमुख श्रीमती सविता बोराडे मॅडम, सचिव श्रीमती ज्योत्स्ना बाक्रे, मॅडम कार्याध्यक्ष श्रीमती स्नेहल जाधव मॅडम, तालुका महिला संघटक श्रीमती कांचन पाटील मॅडम, श्रीमती सुषमा राणे मॅडम, श्रीमती उज्वला बोरोले मॅडम, श्रीमती हेमलता म्हात्रे मॅडम, महिला संपर्कप्रमुख श्रीमती सुनंदा पोखरकर मॅडम, श्रीमती मनीषा कोरे मॅडम, श्रीमती परवीन शेख मॅडम व श्रीमती साधना करंदीकर मॅडम प्रसिद्धीप्रमुख श्रीमती साक्षी जाधव मॅडम व श्रीमती अश्विनी थोरात मॅडम. त्याचप्रमाणे त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सुरेश चव्हाण सर, राजेश जाधव सर, नागोटकर सर यांनी आपले विचार मांडले.
सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम म्हात्रे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
अनंत खैरे सर यांनी सर्व उपस्थितांचे कर्जत शाखेच्या वतीने आभार मानले व अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला.