पुढील 72 तासात डीपी न मिळाल्यास प्रहारचे जिल्हा संघटक नितीन पानसरे यांचा महावितरणला आत्मदहनाचा इशारा..

गेले महिनाभर पेक्षा जास्त दिवसांपासून कोल्हार खुर्द तांदूळनेर रोड मुसमाडे वस्ती येथील कासुबाई गावठाण डीपी बंद आहे. वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तोंडी विनंती करूनही आजपर्यंत त्यांनी कुठलीही हालचाल न केल्यामुळे शेवटी नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या होत असलेला हाल-अपेष्टा बघून,तसेच शेतातील पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिके जळण्याच्या परिस्थितीवर आहेत. पाळीव जनावरांच्या पण पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. याची दखल महावितरण ने न घेतल्यामुळे पुढील 72 तासात जर डीपी नाही बसवली तर अधीक्षक अभियंता अहमदनगर यांच्या दालनासमोर सोमवार दिनांक 27. 9. 2021 रोजी दुपारी बारा वाजता मी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करील आणि याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील याचे निवेदन अधीक्षक अभियंता यांना दिले.

यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ परदेशी जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले की जर शेतकऱ्यांना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे जर आत्मदहन करावे लागत असतील तर याचे परिणाम महावितरणच्या अधिकाऱ्यांना भविष्यात भोगावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!