वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी थेट केंद्रीय मंत्र्यांना मागणी…

Read Time:3 Minute, 3 Second

प्रतिनिधी : कोरेगाव भीमा (विनायक साबळे)

मागील अनेक वर्षांपासून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असुन या रस्त्यावर फक्त डागडुजी करण्यात येत असल्याने या भागातील वाहन चालकांना तसेच शेतकरी वर्गाला प्रवास करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी व केंद्रीय मार्ग निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे जिल्हा भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी मागणी केली आहे.
विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात आले असता जयेश शिंदे यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले. कोरेगाव भिमा ते श्रीक्षेत्र वढू येथील रस्ता खूप खराब झाला आहे. आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे आहे. यामुळे समाधी स्थळावर नतमस्तक होण्यासाठी दररोज संपूर्ण महाराष्ट्रातुन शंभुभक्त या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांची व परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. खराब रस्त्यामुळे लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी या रस्त्याच्या कामासाठी 15 कोटी रुपये निधी उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच खराब रस्त्याचे फोटो व व्हिडीओ याप्रसंगी नितीन गडकरी यांना दाखविण्यात आले असल्याचे जयेश शिंदे यांनी सांगितले. या रस्त्यासाठी लागणार निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.असल्याचेही जयेश शिंदे यांनी सांगितले
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीष बापट, माजी आमदार योगेश टिळेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, मार्गदर्शक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!