
मोटारसायकल वरून आले आन् तीन लाखची रोकड घेऊन पसार झाले..
कोरेगाव भीमा:प्रतिनिधी – (विनायक साबळे)
ता. २९.०९.२०२१ रोजी दुपारी ०१.१५ वा. चे सुमारास रोहिदास बाजीराव शिवले व त्यांचा मुलगा स्वप्नील शिवले हे दोघे शिक्रापुर पाबळ चौक येथील ऍक्सिस बॅंक मध्ये रोख रक्कम काढणेसाठी गेलो असताना. सदर ठिकाणी बँकेतून रोहिदास बाजीराव शिवले यांनी स्वप्नील रोहिदास शिवले याचे खात्यातुन रोख ५ लाख रूपये काढुन घेतले. त्यानंतर दुपारी १.३० वा. चे सुमारास रोहिदास शिवले व मुलगा स्वप्नील असे सदर बॅंकेतुन बाहेर निघाले असता स्वप्नीलकडे २ लाख रूपये होते. ते त्याने त्याचे पॅंटचे खिशात ठेवले होते. तर उर्वरीत ३ लाख रूपये हे रोहिदास शिवले यांनी सोबत आणलेल्या पांढरे रंगाचे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले होते. व ती पिशवी रोहिदास यांच्या हातातच धरलेली होती. त्यांनतर दोघे सदर बॅंकेतुन बाहेर पुणे नगर हायवे रोडवर आल्यावर स्वप्नील शिवले त्याच्या कामानिमित्त निघून गेला त्यानंतर रोहिदास शिवले यांचा मेहुना नाथा उमाप व त्याचा मित्र खळदरकर हे तेथे येऊन त्यांनी चहा घेवुया असे सांगुन ते त्यांचे मो.सायकलवर व रोहिदास शिवले त्यांच्या मोटार सायकलवर काका पुतण्या हॉटेलकडे जात असताना त्यांच्याकडील 3 लाख रूपये असलेली पांढरे रंगाची पिशवी रोहिदास यांच्या डावे हातात घरून दुचाकी चालवीत असताना अचानक समोरून एक काळे रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने शिवले यांच्या हातातील 3 लाख रूपये असलेली पिशवी जबरीने हातातुन ओढुन ते त्यांचे ताब्यातील मोटार सायकलसह चाकण चौकाकडे निघुन गेले. सदर मोटार सायकलवर बसलेल्या दोन अनोळखी इसमापैकी पुढील इसमाला शिवले पाहु शकले नाही. परंतु पाठीमागे बसलेल्या इसम हा जाड असुन त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असुन त्याने पांढरे रंगाचा त्याावर काळे रंगाचे मोठे ठिपके असलेला फुल बाहयाचा शर्ट घातलेला होता. तो इसम परत मला दिसला तर मी त्याला ओळखू शकेल असे रोहिदास शिवले यांनी सांगितले
पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक पठारे करत आहेत