ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद यवत पोलीस स्टेशनची कारवाई..

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील बोरिभडक येथील १७ /०२/२०२१ रोजी कॅनल च्या कडेला असणारी ट्रान्सफॉर्मर डीपी खाली पाडून त्यातील दीडशे किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते सदर बाबत यवत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा उघडकीस आणून एकूण ६४४००/- रुपये किमतीचा तांब्याच्या तारा जप्त करून आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडे यवत पोलीस स्टेशन हद्दीमधील तीन गुन्हे उघडकीस आणल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ट्रांसफार्मर डीपी चोरी चे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे कामी आदेश केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश कदम, संदीप कदम, निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, महेंद्र चांदणे, निखिल रणदिवे, मारुती बाराते, रामदास जगताप, प्रमोद शिंदे यांचे पथक तयार केले होते सदरच्या पथकाने ट्रांसफार्मर डीपी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी चेक करून माहिती संकलित करण्यात आली होती दरम्यान रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद केल्याचे समजलेने सदर ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणाऱ्या टोळीला पोलीसांनी तपास कामी ताब्यात घेतले असता सदर टोळीने यवत पोलीस स्टेशन हद्दीत मौजे बोरीभडक, राहू परिसरात ट्रांसफार्मर डीपी चोरी केल्याचे सांगितले असून इसम नामे १) सचिन उर्फ गुलट्या सुभाष काळे वय-२१,२) आकाश उर्फ गोट्या सुभाष काळे वय-१९ गणेगाव खालसा तालुका शिरूर जिल्हा पुणे,३) साहिल उर्फ नटया शैलेश सुधाकर भोसले वय-२० रा. वाखरी तालुका फलटण जि.सातारा, ४) उमेश बलीचरण यादव वय-१९ ,५) गोविंद हनुमान यादव वय-२१, ६) करिमुल्ला आतिउल्ला मनियार वय-२२,७)घरभरण औंधाराम यादव वय-३६,८) आकरम यासीन रगरेंज वय-५० सर्व रा. उत्तर प्रदेश सध्या रा. रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे कडुन बोरीभडक ,राहु, परिसरातील डीपी ट्रान्सफार्मर चोरीचे तीन गुहे उघडकीस आणण्यात आले आहेत मा.सेशन कोर्ट बारामती यांनी ०१/१०/२०२१ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कदम हे करीत असून आरोपींकडून आणखीन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!