माहिती सेवा समिती कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी – चंद्रकांत वारघडे

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी (विनायक साबळे) : शुद्ध आचार,शुद्ध विचार,निष्कलंक जीवन,त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता ही पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे.प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास,आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी पाहिजे. कार्यकर्त्यांनी निस्वार्थी काम करावे असे आवाहन वढू येथे पार पडलेल्या पुणे जिल्हा माहिती सेवा समिती कार्यकर्ता आढावा बैठकी दरम्यान माहिती सेवा समिती चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले..

माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वढू येथे पुणे जिल्हा कार्यकारिणी च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते..याप्रसंगी चंद्रकांत वारघडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करावा, गाव तिथे कार्यकर्ता, प्रत्येक सरकारी कार्यालयातील चुकीच्या कामांना आळा बसण्यासाठी कसे नियोजन केले पाहिजे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन यावेळी चंद्रकांत वारघडे यांनी केले.. mseb संधर्भात माहिती अधिकार कायदा कसा वापरावा याबाबत चे सविस्तर मार्गदर्शन पुणे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोतवाल यांनी केले.. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव प्रशांत भागवत,उपाध्यक्ष बाळासाहेब वारघडे,खेड तालुका अध्यक्ष प्रशांत वाडेकर,हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट,शिरूर तालुका कार्याध्यक्ष शरद टेमगिरे,उपाध्यक्ष सुनील सात्रस,शिरूर तालुका वृक्ष संवर्धन समिती अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
माहिती सेवा समिती चा कार्यकर्ता हा डोळ्यात पाणी येऊ देणारा नाही तर सरकारी अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. भविष्यात प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे माहिती सेवा समिती खंबीर पणे उभी राहणार असल्याचे आश्वासन यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी दिले..
माहिती सेवा समिती पदाधिकारी आढावा बैठकी मध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सागर खांदवे (लोहगाव), वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी सागर इंगळे (वडगाव शेरी),दौंड तालुका अध्यक्ष पदी थोरात (वाळकी) , पुणे शहर संघटक पदी गणेश गवारे (पुणे), पुणे शहर शिक्षण समिती अध्यक्ष पदी मिश्रा (पुणे), कायदेविषयक सल्लागार पदी ॲड. कमल सावंत(पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली..
पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेबद्दल सुनील भांडवलकर(दैनिक लोकमत),सचिन धुमाळ(दैनिक पोलीसनामा),शेरखान ,सुरेश वांडेकर (दैनिक लोकमत),अमोल दरेकर(साप्ताहिक शिरूर हवेली),गणेश सातव(दैनिक केसरी)ज्ञानेश्वर पाटेकर (स्टार महाराष्ट्र न्युज),बंडू ब्राह्मणे (दैनिक प्रभात),गजानन गव्हाणे(दैनिक पुढारी) यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान झाल्याबद्दल माहिती सेवा समिती पुणे जिल्हा च्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष श्री शरदराव पाबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मुळशी तालुका अध्यक्ष निखिल बोडके,मावळ तालुका अध्यक्ष गणेश सावळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद ढेरंगे,शिरूर तालुका उपाध्यक्ष शिर्के,विशाल वाडेकर,नागेश शिवले,शुभम शिवले,प्रकाश नागरवाड,गणेश जाधव यांच्या सह समिती चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष शिवले, पार्थ नानेकर यांनी तर आभार सचिव प्रशांत भागवत यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!