दरोड्याच्या व खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद..

– दौंड गुन्हे शाखा पथकाची कामगिरी

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद

दिनांक ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस दौंड गुन्हे शाखा पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून दौंड पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या व पुणे ग्रामीण अभि लेखाच्या यादीवरील सराईत असलेले दरोड्याच्या व खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील मागील तीन वर्षांपासून पासून फरार असलेले आरोपी नामे १)अनिकेत अरविंद सोनवणे राहणार वडार गल्ली तालुका दौंड हा मागील १ महिन्यापासून फरार होता व २) निलेश गणेश कदम रा.सिध्दार्थनगर, दौंड हा मागील तीन वर्षांपासून फरार होता, या दोघांना अटक करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.सदर आरोपींवर शासकीय कामात अडथळा करणे, दरोडा, घरफोडी, आर्म ऍक्ट ,बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे असे वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली दौंड डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी पो. हवा. सुभाष राऊत , पो.ना अमोल गवळी ,पो.ना किरण राऊत, पो.ना आदेश राऊत, पो ना. सचिन बोराडे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते ,पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र काळे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!