
दौंड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत यश..
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
२०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय पात्रता परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद येथील दोन विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे, सायली दत्तात्रय शिंदे आणि ओम देविदास गलांडे या दोघांची जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. २०२०-२१ या कालावधीत कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असूनही ऑनलाईन अध्यापन सुरू होते. इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक देविदास गलांडे सर यांनी वर्षभर ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले, विद्यार्थ्यांच्या या यशाचे शाळेचे मुख्याध्यापक मणियार सर, शाळेतील सहकारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. दौंड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे साहेब व कुरकुंभ केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी गोरे यांनी शाळा, शिक्षक, व विद्यार्थी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आणखीन काही महत्त्वाचे
संजय कुमार पाटील यांच्या हस्ते अतिदुर्गम भागात वह्या वाटप..
माननीय .पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील सर . यांच्या सहकार्याने मौजे कुतूर विहीर या गावात जिल्हा परिषद शाळा कुतुर विहीर...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण…
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे....
एक अनोखा उपक्रम गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय येथे करण्यात आला…
आज दिनांक २१-६-२०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत,...
ऑनर लॅब कंपनी कडून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप..
दौंड- पुणे :- आलिम सय्यद कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील ऑनर लॅब कंपनीने कंपनीच्या सीएसआर फंडातून दहा जिल्हा परिषद शाळांना...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन..
जव्हार-- दि. १६-६-२०२२ रोजी घडलेल्या घटने संदर्भात गुरुवार दिनांक १६-६-२०२२ जव्हार पासून केवळ ७ ते ८ किंमी असणाऱ्या वडपाडा येथील...
जव्हार शहरातील भगवान जोशी यांचे घर आग लागून पूर्णपणे खाक …
दि. १९-६- २०२२ रोजी रात्री सुमारे १-३० वाजता जव्हार शहरात अंबिका चौक येथील भगवान जोशी यांच्या घराला अचानक मोठी आग...