प्रतिनिधी :- आलिम सय्यद , दौंड-पुणे
Head:- कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सम्राट कंपणीला लागली आग : कंपनीला मार्च महिन्यात आग लागल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू .
Video :- दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील प्लॉट नंबर डी-२ सम्राट पल्प अँड पेपर प्रा ली.
या कंपनीत पहाटे तीन ते चार च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडलीय. सदर ही आग कंपनीसाठी लागणारा कच्चा माल ठेवयाच्या पेपर रद्दी क्राँप्ट वेस्टेज पेपर स्टोअर ( गोडाऊन ) ला आग लागल्याची माहिती मिळतीय . सदर कंपनी पुठ्ठा तयार करण्यासाठी लागणारा पेपर तयार करत आल्याचे कंपनी एच आर, ( व्यवस्थापक ) प्रदीप बडघरे यांनी सांगितले. तसेच घटनेबाबत कंपनी चे एच आर यांना माहिती विचारली असता माहिती देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. तसेच कंपनीत सुरक्षेसाठी लागणारी फायर लाइन दिसून आली नाही. सदर कंपनी कसल्याही प्रकारची सुरक्षा ( सेप्टी ) वापरत नसल्याचं बोललं जातंय. सदर आग आटोक्यात आणण्याचे काम कुरकुंभ एमआयडीसी अग्निशमन दलाचे दोन बंब व दौंड नगरपालिका अग्निशमन दल चे एक बंब यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तब्बल पाच ते सहा तास आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता.सदर घटनेत कसलीही जीवित हानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाचे सुधीर खांडेकर यांनी सांगितले. सदर ही आग मार्च महिन्यात लागल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे .