
तात्काळ डांबरीकरण करण्याची परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची मागणी
फैजपुर प्रतिनिधी
यावल तालुक्यातील खिरोदा व फैजपुर हे गाव परिचित व इतिहासात लिहिले गेलेले प्रसिद्ध गाव आहे,सन १९३६ साली फैजुपरला अधिवेशन भरले होते,त्या साली राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अनेक महात्म्यांसह फैजपुरहुन खिरोदा ह्या गावी पायी पायी चालत आले होते,आणि खिरोदा येथील गावकऱ्यांना महात्मा गांधीजी बोलले होते की,माझेसाठी खिरोदा हे गाव तिर्थक्षेञ आहे,मग एवढे ऐतिहासिक नावाजलेल्या खिरोदा,फैजपुर गावाच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष का ?असा प्रश्न सद्ध्यास्थितीत गावकऱ्यांना सतावत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की खिरोदा ते फैजपुर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याने ,प्रवास करणे जिकरीचे झाले आहे ,पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे,प्रवास कसा करायचा हेच समजायला मार्ग नाही,ही परिस्थिती लक्षात घेत पञकारांनी विविध वृत्तपञांमधे खिरोदा ते फैजपुर रस्ता डांबरीकरण करावा. अशा बातम्या देखील प्रकाशित केल्या.माञ त्याचा काहीही एक उपयोग होत नसल्याचे चिञ सद्ध्यास्थितीत पहावयास मिळत आहे.त्याचबरोबर खिरोदा हे गाव रावेर ,यावल तालुक्याच्या आमदारांचे गाव आहे,तरी सुद्धा या खिरोदा ते फैजपुर रस्त्याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे.या रस्त्याने प्रवास करीत असतांना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्याने प्रवास करीत असता अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे.असा हा हा प्रकार कुठपर्यंत चालणार?हे माञ गुलदस्त्यात आहे. तसेच ह्या रस्त्याचा संपुर्ण प्रकार बांधकाम विभागाचे अधिकारी व आमदार व खासदार संबधित पदाधिकारी यांना माहित असल्यावरही जाणीवपुर्वक का दुर्लक्ष करीत आहेत व ह्या संबधितांनी कुंभकर्णाची झोप घेतली आहे की काय? असे खिरोदा व फैजपुर येथील जनतेकडुन बोलले जात आहे.तर कुठपर्यंत चालणार हा प्रकार ? अशा चर्चेला देखील परिसरातील जनतेकडुन उधान आले आहे. आणि या खिरोदा ते फैजपुर रस्त्याचे तात्काळ लवकरात लवकर डांबरीकरण न केल्यास संबधित गावांचे नागरिक,शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशारा संबधित विभागाला या प्रसिद्धी पञकाद्वारे देण्यात आला आहे..तरी संबधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व आमदार , खासदार यांनी खिरोदा ते फैजपुर या रस्त्याकडे ताबडतोब लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण करावा.अशी रास्त स्वरुपाची मागणी खिरोदा,फैजपुर व परिरातील जनतेकडुन, वाहनधारकांकडुन,शेतकऱ्यांकडुन ,मजुरांकडुन करण्यात आली आहे… पाहुया..या रस्त्याची दखल घेतली जाते किंवा नाही.