या बँकेचे आपण ग्राहक असाल तर मिळणार ५ लाख रुपये…

मुंबई वृत्तसेवा

भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) उपकंपनी असलेली डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) ही रक्कम एका नवीन नियमानुसार जारी करेल. डीआयसीजीसीने यापूर्वी 21 बँकांची (Bank) यादी तयार केली होती, परंतु पाच बँका या यादीतून वगळल्या गेल्या होत्या. यामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचा (पीएमसी) समावेश आहे. त्यांच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांचे ठेव विमा संरक्षण मिळणार नाही.

या पाच बँका एकतर विलीनीकरणाच्या स्थितीत आहेत किंवा आता स्थगितीतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना 5 लाख रुपये मिळणार नाहीत. ऑगस्टमध्ये, संसदेने DICGC विधेयक, 2021 मंजूर केले. RBI ने बँकांवर स्थगन लादल्यापासून 90 दिवसांच्या आत खातेदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळावी, हा यामागचा उद्देश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!