वर्दीतला दानशूर व्यक्ती पोलीस निरीक्षक नारायण पवार..

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा वाढदिवस कुरकुंभ येथील अवश्री बालसदन येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असला की वाढदिवस मोठ्या थाटा माठात करावसा वाटतो परंतु दरवर्षी पोलीस निरीक्षक नारायण पवार हे आपला वाढदिवस आपल्या पोलीस ठाणेच्या हद्दीत असणाऱ्या बालसदन मध्ये लहान मुलांसोबत साजरा करतात. या लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना एक वेगळाच आनंद येत असतो कारण या लहान मुलांना कोणीच नाही त्यामुळे या लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते असे यावेळी पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी सांगितले की ज्यांच्या साठी कोणी नाही त्यांच्यासाठी आम्ही पोलीस रक्षण करण्यासाठी असतो असे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच अवश्री बालसदन मधील मुले, व पोलीस स्टाफ उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!