दिव्यांग दिन विशेष- दिव्यांगांच प्रभावी नेतृत्व चाँद शेख यांचा जिवनप्रवास

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी या छोट्याशा खेडेगावात कुटूंबाची परिस्थिती अत्यंत हलाकीची,
घरात आठरवे विश्व दारिद्र,बिकट परिस्थिती,ऊसतोड करणा-या कुटुबांत चाँद शेख याचा जन्म झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओ झाला असल्याचे त्यांच्या आई वडीलांच्या लक्षात आले.त्यानंतर वय वर्ष पाच ते सहा असतांना चालता येत नसल्याने त्यांच्या आईने मोलमजुरी करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी पर्यंत त्यांचे शिक्षण केले यासाठी त्यांची आई रोज गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायची रोज सकाळी शाळेत मुलाला घेऊन जायचे व संध्याकाळी मोलमजुरी करून आल्यावर शाळेतून घरी आणायचे हा त्यांचा दैनंदिन नित्यनियम असे.या काळात चाँद शेख हातावर माकडउड्या मारत हळूहळू चालत असे.याच दरम्यान पिंगेवाडी येथील खामकर गुरुजींनी स्वतःच्या खर्चाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नगरला घेऊन जाऊन अपंग प्रमाणपत्र पत्र काढून दिले आणि शासन नियमात असलेले अपंग झाले.परंतु त्यांच्या मुलांकडे पाहून त्या सतत त्यांना वाटे आता माझ्या मुलाचे काय होणार कसे होणार हा प्रश्न भेडसावत असे त्यानंतर गावचे पोलीस पाटील मधुकर शेलार यांच्या मदतीने चाँद शेख यांच्या पायावर नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये त्यांच्या गळ्यात विळखा घातलेला पाय सरळ करण्यात आला यावेळी त्यांची आजी बिबाबाई दगडू शेख यांनी चाँद शेख यांची काळजी घेतली.
त्यांनतर चाँद शेख यांचा पुढील शिक्षणासाठी प्रवास सुरु झाला.पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण चापडगाव येथे झाले या दरम्यान शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या बहीण नगीना शेख हिला सहावीत शाळा सोडून मोलमजुरी करावी लागली यामधून घर खर्च व शिक्षणाचा खर्च जेमतेम चालू लागला.
दहावीत असतांना परीक्षा फी भरण्यासाठी नसल्याने अडचणीत आल्याने महादेव हजारे यांनी चाँद शेख यांनी दहावीची परिक्षा फी भरली.यानंतर कृषी पदविकेस प्रवेश घ्यायचाचा परंतु यासाठी असणारी फी भरण्यास सक्षम नसल्याने पुन्हा हतबल झालेल्या चाँद शेख यांचा जिवलग मित्र उद्धव वाघ यांनी देखील कृषी पदविकेस प्रवेश चाँद शेख यांची फी भरा नाहीतर मी पण शिकणार नाही असे म्हणून दोन दिवस उपाशी पोटी राहून चाँद शेख यांची फी भरली ही भरलेली फी भरण्यासाठी त्यांचे वडील कादर दगडू शेख आई दिलशान कादर शेख व लहान भाऊ मोहमद कादर शेख यांनी ऊस तोडणी उचल घेऊन फी साठी घेतलेले पैसे फेडले या दरम्यान कर्जत येथील अशोक जायभाये यांनी देखील फी भरण्यासाठी दहा हजार दिले हे दिलेले पैसे मागे देण्यासाठी गेलो असता त्यांनी पैसे न घेता याचा उपयोग शिक्षणासाठी कर असे सांगीतले.
यानंतर अकरावी साठी न्यू आर्ट कॉलेज शेवगाव येथे प्रवेश घेतला व बारावी साठी कालिका देवी विद्यालय शिरूर कासार येथे प्रवेश घेतला इयत्ता बारावीची फी नवनाथ घुले यांनी भरली बारावीत असतांना सुनील घुले याने चाँद शेख यांना दैनंदीन रोजच्या सर्वं बाबीत मदत केली याच दरम्यान तींतरवनी येथून वर्षभर एक वेळचा डबा शिरूर येथे भीमराव आघाव घेऊन येत.बारावी शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रतिष्ठान महाविद्यालयात पदवी पूर्ण केली.यानंतर डीएड साठी प्रवेश घेतला डीएड पूर्ण केले यासाठी पुन्हा चाँद शेख यांचे आई भाऊ व बहीण यांनी ऊसतोडणी करून डीएड केले.डीएड आल्यानंतर सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्याशी चांद शेख यांची ओळख झाली आणि दिव्यांग क्षेत्रात कामगीरी सुरू झाली.हे काम करत असताना नवनाथ औटी यांनी शेवगाव मध्ये असतांना चांद शेख सर्वं खर्च केला.त्याच बरोबर उच्च शिक्षण एम ए साठी दोन वर्षे सर्वं खर्च करून एम इ पूर्ण झाले त्याच बरोबर आजही मदत करत आहेत.याबरोबरच वैभव जगताप यांनी चाँद शेख यांची मोफत टायपिंग करून दिली यासाठी त्यांनी फी घेतली नाही.बाबासाहेब महापुरे व नवनाथ औटी यांच्या सहकार्याने आजपर्यंत दिव्यांग क्षेत्रात समाज सेवा करत आहे त्याच बरोबर सावली संस्थेच्या माध्यमातून त्यांचा विवाह देखील घडून आला आहे.आज दिव्यांग क्षेत्रात चाँद शेख यांनी जे सामाजिक कार्य केले आहे याचे सर्वं श्रेय बाबासाहेब महापुरे,नवनाथ औटी,सावली संस्थेचे व संघटनेचे पदाधिकारी व शेवगाव तालुक्यातील सर्वं पत्रकार बांधव यांना आहे.याच दरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी साठी प्रवेश घेतला यासाठी जमीर शेख यांनी एक रुपया देखील न घेता मोफत शिक्षण पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले.दिव्यांग सेवा करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आर्थिक अडचण असूनही कधीही कोणत्याही दिव्यांग बांधवांची फसवणूक केली.निस्वार्थी काम केले आहे हे काम करत असताना सर्वं पक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. सर्वं सामाजिक संस्था व संघटना यांनी सदैव सावली दिव्यांग संस्था व संघटनेस मदत केली.
शेवगाव तालुक्यातील सावली दिव्यांग संस्था व संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्वं दिव्यांग बांधवांचा अभिमान असल्याचे यावेळी सांगितले.दिव्यांग सेवा करत असताना राजकीय गुरू खरेदी विक्री संघाचे संचालक तसेच पिंगेवाडी येथील मा.सरपंच अशोक तानवडे यांच्या सहकार्याने दोन दिव्यांगाना ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार म्हणून उभे करत निवडणूक लढवत निवडणूक देखील जिंकली.चाँद शेख यांनी यावेळी सांगितले की जीवन जगत असतांना अनेक नागरिकांनी मदत केली सगळ्यांचे आभार मानत असतांना चाँद शेख यांना अश्रू अनावर झाले.आता उर्वरित आयुष्य सावली दिव्यांग संस्थेच्या व संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग सेवा व समाज सेवा करण्याचे आहे असे म्हणून चाँद शेख यांनी सर्वं दिव्यांग बांधवांना सावली दिव्यांग संस्थेच्या व संघटनेच्या वतीने जागतीक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!