
कुरकुंभ गावचे सरपंच पदी आयुब शेख यांची निवड…
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आयुब सल्लाद्दिन शेख यांची निवड करण्यात आली.
राहुल भोसले यांचे सरपंच पद उच्च न्यायालयाने अपात्र ठरविण्यात आल्याने नवीन सरपंच
निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आले होते . शुक्रवार ( ता.०३ )डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा पार पडली. यात सरपंच पदासाठी पुष्पा सुनील पवार, साधना निलेश भागवत, विजय ज्ञानदेव गिरमे, शुभदा संजय शितोळे आणि आयुब सल्लाद्दीन शेख असे एकूण पाच अर्ज दाखल झाले होते. त्यामधील पुष्पा पवार, विजय गिरमे, साधना भागवत यांनी आपले अर्ज माघार घेतल्याने आयुब शेख आणि शुभदा संजय शितोळे यांच्यात लढत होवून एकूण १३ ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये आयुब सल्लाद्दीन शेख यांना ७ मते तर शुभदा शितोळे यांना ६ मते मिळाली. यावेळी आयुब शेख यांना बहुमत मिळाल्याने शेख यांना सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी पाटस सुनील नारायण गायकवाड यांनी काम पाहिले तसेच यावेळी ग्रामसेवक संदीप नारायण ठवाळ, तलाठी योगिता राजेंद्र कदम , कोतवाल संजय गायकवाड, उपसरपंच विनोद नरसिंग शितोळे, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच पुष्पा सुनील पवार, माजी उपसरपंच सायरा रफीक शेख,सुनिता शंकर चव्हाण ,सूर्यकांत धोंडीबा भागवत, ग्रामपंचायत सदस्य शुभदा संजय शितोळे,अपर्णा बाळासाहेब साळुंके,साधना निलेश भागवत,भामाबई हरिभाऊ दोडके,जाकिरहुशेन गुल्फाम शेख विजय ज्ञानदेव गिरमे, उमेश हनुमंत सोनवणे उपस्थित होते.तसेच कुरकुंभ पोलिस मदत केंद्राचे राकेश फाळके, अनिल कोळेकर , शंकर वाघमारे,श्रीरंग शिंदे,अमोल राऊत, महेश पवार पोलिस अधिकारी उपस्थित होते.