महाविद्यालय दर्जेदार शिक्षण उत्तम चरित्र व शिस्तीचे केंद्र बनावे – मा सिद्धेश्वर आखेगावकर

राजु तडवी फैजपूर

शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो व त्यातून भविष्यातील उज्ज्वल संधी प्राप्त होतात. मात्र शिक्षण घेताना शिस्त, चारित्र्य व उच्चतम ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी झोकून दिले पाहिजे. त्यासाठी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालयातील वातावरण पोषक करून समाजासमोर आदर्श निर्माण करने ही सुद्धा आमची जबाबदारी असून महाविद्यालय प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन फैजपुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित शिस्त समिती, लैंगिक छळ प्रतिबंधक समिती व अँटी रॅगिंग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारविनिमय सभेत बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, मा लोखंडे साहेब, मा मकसूद शेख यासोबत उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे व तीनही समितीतील चेअरमन, प्राध्यापक , प्राध्यापिका उपस्थित होते .

सभेच्या आयोजनामागील हेतू प्रास्ताविकातून शिस्त समितीचे चेअरमन प्रा डॉ मनोहर सुरवाडे यांनी उपस्थितांसमोर मांडला. महाविद्यालयाची परंपरा आदर्शवत असून भविष्यही उज्वल आहे यासाठी महाविद्यालयात अध्ययन, अध्यापन आणि संशोधन यासाठी उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने महाविद्यालयाला पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यप्रसंगी बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी सांगितले की, महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनीमधे शिस्त निर्माण व्हावी, महाविद्यालया बाहेरिल टवाळखोर मुलांना प्रतिबंध व्हावा, रैगिंग संबधी कोणतेही प्रकरने महाविद्यालयात होऊ नये यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि यात सर्वांच्या सहकार्यने नक्कीच यश लाभेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी सभेला डॉ कल्पना पाटील, डॉ जी जी कोल्हे, प्रा वंदना बोरोले, डॉ सविता वाघमारे, डॉ पंकज सोनवणे, प्रा सतीश पाटील, श्री डी एस चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शेखर महाजन व श्री सिद्धार्थ तायडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!