कळंबमध्ये शिवसेना,राष्ट्रवादीला जोरदार झटका..

कळंब मिरचुलवाडी येथील शिवसेना,राष्ट्रवादी कार्यक्रर्त्यांनी घेतला शेकापचा लाल बावटा

कर्जत प्रतिनिधी:-संजय कदम

आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.कर्जत तालुक्यातील कार्यतत्पर मा.समाज कल्याण सभापती नारायण डामसे साहेब, कळंब ग्रा.पं.सदस्या निलम ढोले, प्रकाश निरगुडा, जानकी पारधी, मा.सरपंच रेवता ढोले, कृष्णा बदे, पांडुरंग बदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज कळंब ग्रा.पं.मधील मिरचुलवाडी येथील शिवसेना,राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यक्रत्यांनी शेकाप पक्षात प्रवेश करून शेकापचा लाल बावटा हाती घेतला. त्यामध्ये कळंब ग्रा.पं.मधील मिरचुलवाडी येथील महेश निरगुडा, हरिचंद्र ढोले, हरी ढोले, भरत दोरे, हरिचंद्र पारधी, लालू पारधी, वामन निरगुडा, गणेश पारधी, पांडुरंग निरगुडा, हनुमान आवाटे, मारूती ढोले, सोमा आवाटे, धनेश कांबडी, काशिनाथ ढोले, गणेश ढोले, बुधाजी मेंगाळ, गणपत निरगुडा, गोपाळ दोरे, भरत निरगुडा, काळुराम निरगुडा, सुनिल ढोले, काशिनाथ ढोले, जनार्दन दोरे, लक्ष्मण मेंगाळ, चंद्रकांत कडाळी, गणेश पारधी, विलास कांबडी, गणेश निरगुडा, सुनिल ढोले, सुरेश निरगुडा, करण ढोले, प्रकाश मेंगाळ, बुधाजी मेंगाळ, गणेश ढोले, किरण केवारी, गणपत निरगुडा, विलास मेंगाळ, मारूती ढोले, जनार्दन आवाटे, राजेश पारधी, तुकाराम निरगुडा, शिवाजी निरगुडा, जानू पारधी, राहूल निरगुडा, सुनिल निरगुडा, राजेश ढोले, बबन आवाटे, राम निरगुडा या कार्यक्रत्यांनी लाल पटटा घालून शेकाप पक्षात जाहिर प्रवेश केला. पक्ष प्रवेश कार्यक्रमा प्रसंगी पं.स.उपसभापती जयवंती हिंदोळा, जेष्ठ कार्यक्रर्ते सुलतान कुरेशी, भरत ऐनकर, नारायण मोरे, गणेश मानकामे,सुनिल बदे, कृ.उ.बा.स.संचालक बबन भालेराव,पोशिर ग्रा.पं.सदस्य दत्ता राणे,पुरोगामी संघटना उपाध्यक्ष महेश म्हसे, कशेळे ग्रा.पं.उपसरपंच आदित्य गायकवाड, कार्यक्रर्ते मंगेश खेडेकर, गणेश म्हसे,मोग्रज ग्रा.पं.सदस्य शिवाजी सांबरी आदि उपस्थित होते. कर्जत विधानसभा मतदार संघातील कळंब जि.प.विभाग हा शेकाप चा बाल्लेकिल्ला असून स्व.पेमारे साहेब व स्व.प्रवीणशेठ पाटील यांच्या माध्यमातून या विभागातील प्रत्येक गाव,आदिवासी वाडया,मुस्लिम मोहल्ले व दलित वस्ती,मध्ये मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत. मिरचुलवाडी मध्ये झालेली विकासकामे शेकाप पक्षाच्या माध्यमाने झाली असल्याने खोटी आश्वासने देऊन पक्ष प्रवेश करून घेणाऱ्या इतर पक्षाच्या पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावे कि, कळंब ग्रा.पं.मधील कार्यक्रर्ते व मतदार बंधू भगिनी आजदेखील शेकाप मध्ये एकनिष्ठ आणि ठाम आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!