जिल्हा परिषद ,पंचायत समिती,न.परिषद निवडणुका जिंकून शिवसेना इतिहास घडवणार !

शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचे प्रतिपादन !

दौंड :- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यात जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेकडून होत असलेली पक्षबांधणी व शिवसेनेत होत असलेले पक्षप्रवेश पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती,दौंड नगर परिषद निवडणुका जिंकून दौंड तालुक्यात शिवसेना नक्कीच इतिहास घडवेल असे प्रतिपादन पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी केले. चौफुला येथे शिवसेना कार्यालयात शिवसेना पदाधिकार्‍यांचा आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख महेश पासलकर , दौंड विधानसभा संपर्क प्रमुख ,संजिव शिरोडकर, सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदिप खोपडे , सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी जाधव,युवा सेना सह सचिव मोहसीन शेख, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भीमराव भोसले उपस्थित होते.
यावेळी अहिर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून गेल्या दोन वर्षात , कोरोना,चक्री वादळ, अवकाळी पाऊस ,महापूर अशा अनेक आवाहनाचा सामना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काम पक्षाचे निष्ठावंत सैनिक म्हणून घराघरात घेऊन पोह्चविल्यास शिवसेना राज्यातील क्रमांक एक चा पक्ष होईल असे भाकीत अहिर यांनी पदाधिकारी मेळाव्यात केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख, महेश पासलकर यांचे दि.०३ डिसेंबर रोजीचा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा व दौंड तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दि.०४ रोजीचा आयोजित शिवसेना, युवासेना ,महिला आघाडी पदाधिकारी यांचा मेळाव्यांसाठी सचिन आहिर हे दोन दिवसाचे दौंड दौ-यावर होते. यावेळी अहिर यांच्या हस्ते दिवाळी मध्ये शिवसेना व युवासेना दौंड यांनी आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
पदाधिकारी मेळाव्यात, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दौंड तालुक्यातील स्थानिक औद्योगिक क्षेत्रामध्ये बड्या नावाजलेल्या कंपन्या असून , येथील लाखो बेरोजगार भूमी पुत्रांना रोजगाराची संधी उद्योगमंत्री यांचे माध्यमातून उपलब्ध करून द्यावी. तसेच तालुक्यातील शेतक-यांचा हक्काचा भिमा पाटस कारखाना आज भाडेतत्वावर चालविण्याबाबतच्या निविदा रद्द करून मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन कारखाना चालू करणेबाबत पाठपुरावा करावा अशी विनंती पासलकर यांनी संपर्क प्रमुख अहिर यांना केली. युवा सेना तालुकाअधिकारी समिर भोईटे यांनी प्रास्तविक केले. तर युवा सेना जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!