
जव्हार मधील कापड विक्रेता आफताब मेमन यांच्याकडून साहित्य पुरवठ्यात झालेला भ्रष्टाचार
जव्हार शहरातील कापड विक्रेता आफताब मेमन हा गेल्या 4 ते 5 वर्षापासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा , डहाणु ,या तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये तसेच जिल्हा परिषद शाळेत विविध प्रकारचे साहित्य पुरवीत आहे …
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीस कुठल्याही प्रकारचे साहित्य लागत असेल तर ग्रामसेवक महोदया कडूनआफताब मेमन याला पहिली पसंती दिली जाते…
सदर पुरवठा दाराचे जव्हार मध्ये एक कापडाचे दुकान आहे..
परंतु ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या शाळेत कोणत्याही प्रकारच्या साहित्याची गरज पडल्यास पुरवठादार आफताब मेमन यांच्या कडूनच पुरवठा केला जात असतो.. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की एक कापड विक्रेता ४ते 5 तालुक्यात सर्व प्रकारचे साहित्य पुरविण्याचे नियोजन कसे काय करतो
या साहित्य पुरवठामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गणवेश ,टेबल-खुर्ची फर्निचर, सॅनिटायझर ,औषधे, वह्या-पुस्तके बॅग ,सोलर लाईट ,बाकडे, अशा विविध प्रकारचे साहित्य पुरवठादार यांनी पुरविलेले आहे..
दरम्यान ग्रामसेवक व पुरवठादार व संबंधित विभागाच्या काही बड्या अधिकाऱ्यांसोबत हितसंबंध प्रस्थापित करून हा सर्व प्रकार चालू आहे असे समजते..
या सर्व प्रकारच्या मुळाशी गेल्यावर असे लक्षात येते की केवळ ग्रामसेवक जिल्हा परिषद शिक्षक आपल्या आर्थिक फायद्यासाठी सदर पुरवठादारा सोबत आर्थिक साटेलोटे करून पुरवठ्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करत असतात..
पुरवठादारांकडून पुरवठा बाबत ग्रामपंचायतित दिलेले बिल बोगस आहेत..
यासाठी पुरवठादाराने विविध प्रकारच्या फर्मची स्थापना करून बोगस जीएसटी क्रमांक, , बोगस व्हेट क्रमांक बोगस सही बिला वर टाकून ग्रामपंचायती बरोबर व्यवहार केलेला आहे..
सदर पुरवठादारा विरोधात कुणा पत्रकाराने सामाजिक कार्यकर्त्याने माहितीची मागणी केल्यास ग्रामसेवक तथा संबंधित अधिकार्याकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत आहे, माहिती मागितली असता ग्रामसेवक आफताब मेमन याला फोन करतात,
सदर माहितीबाबत आम्हा पत्रकारांना फाट्यावर मारले जाते, या मुजोर पुरवठादारास शासनाची कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही …
सन 2020 मध्ये जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये मुदत संपलेल्या सॅनिटायझर चा पुरवठा संबंधित पुरवठादाराने केलेला होता त्यावेळी एका स्थानिक रहिवाशाने आवाज उठवला होता परंतु पैशाच्या जोरावर हा गंभीर विषय त्यावेळी दाबण्यात आला होता..
पुरवठादार आफताब मेमन याने आता पर्यंत ग्रामपंचायतीस खोटे बोगस बिल देऊन कित्येक लाखाच्या शासनाचा महसूल बुडविला आहे..
तसेच हा प्रकार आता थांबला नाही तर येणाऱ्या काळात कित्येक कोटीच्या शासनाच्या महसूल बुडणार आहे ,अशा कर चुकवे व्यापाऱ्याकडून शासनाची होणारी आर्थिक लूट थांबली पाहिजे,
व पुरवठा दारावर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे……..
****** प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…..