
आमदार कार्यालय यशोधन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
आमदार कार्यालय यशोधन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
श्रीरामपूर, इम्रान शेख
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमीत्त आमदार लहू कानडे यांच्या यशोधन, श्रीरामपूर येथील कार्यालयात साधेपणाने व कोरोनाचे नियम पाळून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ नेते इंद्रनाथ पा. थोरात, अशोकराव बागुल, ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रा. प्रताप देवरे सर, माजी मुख्याध्यापक निकम सर, डॉ. मितवा कानडे, सौ. क्रांती दळवी, सतिष बोर्डे, राजेंद्र औताडे, अशोक थोरे, लोकवेध चे जाधव, भिमराज बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमानंतर आमदार लहू कानडे यांनी सर्व सहकार्यांसोबत रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच हरेगाव व टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांना भेटी देऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विन्रम अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्व जनतेला बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...