
फैजपूर प्रांत कार्यालय वारकरी संप्रदायावरील अत्याचार च्या निषेधार्थ भजन आंदोलनाने दुमदुमले…
राजु तडवी फैजपूर
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैद तसेच समस्त वारकऱ्यांनी वर केलेल्या अत्याचार भागवत धर्माचा प्रसार यांचा अवमान कोरोना च्या नावाखाली केलेला घोर अपमान च्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच संत महंत भाविकांच्या उपस्थित पळसपुर प्रांताधिकारी कार्यालयाचे आवार भजन सांग कीर टाळमृदुंगाच्यान गजरात राज्य शासनाच्या या कृतीचा निषेधार्थ घोषणा निनादात दुमदुमले याप्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल संत महंत मान्यवरांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयात निषेध व मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनाचा स्वीकार प्रांत कार्यालयातील रशिद तडवी यांनी स्वीकारले याप्रसंगी आपल्या सर्वांच्या भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासित तडवी यांनी केले सदर निवेदनात उल्लेख केला आहे की राज्य सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटाचा फायदा घेत पोलिस प्रशासनाच्या बळाने वारकड यावर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहे महाराष्ट्रातील जास्त कीर्तनकार ह-भ-प कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवणूक केलेली त्यांची नजर काही हा त्याचाच एक प्रकार आहे भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपारिक गणवेश करायला लावणे हिंदुत्वाची व महाराष्ट्राचे संस्कृती असलेल्या भागवतधर्मीय पताकांची अवहेलना करणे हरी भक्त पारायण निरपराध संतांना हटवणे त्यांना अपमानास्पद वागणूक देणे त्यांच्यावर प्रसन्न प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे अत्यंत निषेधार्थ आहे संविधानाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य बहाल केलेले आह त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही म्हणूनच विश्व हिंदू परिषद व समस्त वारकरी संप्रदाय द्वारे या निषेधार्थ भजनी आंदोलन करीत आहोत ह भ प बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणुक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध भागात व विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव वारकरी सप्ताह कीर्तने प्रवचने दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावे जसे कार्यालयात बस प्रवासात थेट किंवा हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थिती ला मान्यता दिली आहे तशी त्यांना अनुमती द्यावी वारकरी संप्रदायाच्या केलेल्या या घोर अपमान अर्थ मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तात्काळ क्षमायाचना करावी या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेचा मान घेऊ नये राज्य सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा या आधीच आम्ही राज्यात विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दिलेला आहे या आंदोलनानंतर ही साधुसंतांची अवहेलना न थांबल्यास महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के असलेला वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबवण्यासाठी येणाऱ्या काळात रस्त्यावर असेल रसा गांभीर्य इशारा निवेदनात देण्यात आला आहे
याप्रसंगी प्रास्ताविक ह भ प नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी मांडले उपस्थित संत महंतांच्या तर्फे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री योगेश भाऊ भंगाळे यांनी समयोचित मनोगत व्यक्त करून समस्त वारकरी भक्तांचे वतीने निषेध व्यक्त केला
याप्रसंगी महामंडलेश्वर श्री पुरुषोत्तम दास जी महाराज ,शास्त्री भक्ती किशोर दास जी महाराज, सुरेश शास्त्री मानेकर महाराज, ह-भ-प दुर्गादास महाराज,ह भ प धनराज महाराज, ह भ प पुंडलिक महाराज ,माजी जि प सदस्य भरत भाऊ महाजन, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते ,सरचिटणीस संजय सराफ ,ऍड कालिदास ठाकूर ,डॉ भरत महाजन ,डॉ चंद्रशेखर पाटील ,माजी नगराध्यक्ष निलेश राणे ,युवराज किरंगे ,भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे ,विकी भाऊ, पिंटू तेली ,रितेश चौधरी,राजेश चौधरी ,रामा होले ,धनराज कोळी बजरंग दल चे प्रतिक भिडे लोकेश कोल्हे यासह संत महंत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.