
जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव ,ने संचलित श्रीराम विद्यालय ,देवगाव .येथे आज 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा..
जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव ,ने संचलित श्रीराम विद्यालय ,देवगाव .येथे आज 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .यानिमित्ताने श्री. अजित राव मुरकुटे पाटील, पंचायत समिती सदस्य भेंडा गण .यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री रावसाहेब पाटील निकम हे होते तसेच विद्यमान सरपंच सौ सुनीता ताई गायकवाड ,स्कूल कमिटीचे अध्यक्ष कचरदास गुंदेचा, अशोक पाडळे ,खानसाहेब ,बाळासाहेब मुरकुटे व बाबासाहेब वाल्हेकर.हे उपस्थित होते. ऑनलाइन मध्ये एसएससीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणारे विद्यालयातील सेवा जेष्ठ शिक्षक श्री शेरे सर यांनी इयत्ता दहावीच्या वर्गातील सर्व मुलांना गुगल मिट ॲपद्वारे द सहभाग घेऊन काही मोजक्या शब्दात मनोज काळे,प्रशंसा वाल्हेकर, जागृती पाडळे. इत्यादी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भाषणे केली तसेच या कार्यक्रमासाठी ऑनलाइन प्रमुख पाहुणे म्हणून श्री संभाजी निवृत्ती मुरकुटे पाटील मुंबई येथून ऑनलाइन सर्व दहावीच्या मुलांना मार्गदर्शन केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच वकील श्री. नारायणराव पंडित यांनीही ऑनलाइन पुणे येथून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी श्री अजित दादा मुरकुटे पाटील श्री कचरदास गुंदेचा यांनी स्वातंत्र्य दिना विषयी आपले विचार व्यक्त केले आणि शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले आणि विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मुरकुटे सर यांनी केले आणि सूत्रसंचालन श्री शेरे सर यांनी
केले व शासकीय परिपत्रकानुसार उपस्थितांना तंबाखू मुक्त करण्याची शपथ दिली आणि आभार श्री सतरकर सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला.