
सावली दिव्यांग संस्थेकडून पत्रकार श्री रवींद्र उगलमुगले यांचा सत्कार..
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
पत्रकार रवींद्र उगलमुगले यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या संस्थेचा पुरस्कार जाहिर
कोरोना काळात पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन पत्रकार उगलमुगले यांच्या कार्याचा गौरव म्हणुन वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या संस्थेने पुरस्कार साठी निवड केली असून ही बाब सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आहे.* त्यांनी आपल्या लेखणीतून तालुका ते जिल्हातील अनेक प्रश्नावर सातत्याने लिखाण करून अनेक प्रश्न धसास लावले आहेत. त्यातच जगभर थैमान घातलेल्या कोरोना महामारी च्या काळातही जिल्ह्यातील विविध कोरोना सेंटरवरवरील वस्तुस्थिती प्रकर्षाने मांडली.समाजातील वंचीत घटक असल्येल्या दिव्यांग विधवा,
गोरगरीबांना असलेल्या अडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी देखील उगलमुगले यांचे मोठे योगदान असल्याचे सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी सांगितले.
याच कार्याची दखल घेऊन सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावली दिव्यांग संस्था व संघटनेच्या वतीने .पत्रकार रवींद्र उगलमुगले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी गुठे,सचिव नवनाथ औटी,कार्याध्यक्ष मनोहर मराठे, संघटक खलील शेख,शहर अध्यक्ष गणेश महाजन,
उपशहराध्यक्ष सुनील वाळके,शहर सचिव गणेश तमानके,अनिल चेमटे, अशोक नगरकरसह आदी बांधव उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शेवगाव तालुक्यातील सर्वं पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे.दिव्यांग बांधवांचा प्रश्न कोणताही असो त्याबाबत लिखाण करून शासनास दरबारी व्यथा मांडण्याची कौतुकास्पद कार्य सर्वं पत्रकारांचे आहे. सावली दिव्यांग संस्था व संघटना कायमस्वरूपी शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचे ऋणी असेल चाँद कादर शेख उपाध्यक्ष सावली दिव्यांग संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य*