बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून ५ देशातील लोकांना लुटले..

Read Time:3 Minute, 7 Second

बीड (Beed) येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना गंडा (Money fraud) घातला आहे. सायबर गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगणाऱ्या तरुणानं विविध देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडा (Looted money by online) घातल्याची बाब उघड झाली आहे.

विशेष म्हणजे संबंधित तरुणानं हा गुन्हा दोन तुरुंग अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठं हवाला रॅकेट समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. अमर अनंत अग्रवाल असं संबंधित तरुणाचं नाव असून तो बीड येथील रहिवासी आहे. पण एका फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित तरुण 2018 पासून मध्य प्रदेशातील भैरवगड कारागृहात शिक्षा भोगत आहे.

संबंधित तरुण हॅकर असल्याने तुरुंगातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती करत, हे काम करायला भाग पाडल्याचा दावा आरोपी तरुणानं पोलीस चौकशीत केला आहे. प्रेयसीला धोका देऊन करत होता लग्न, मंडपातून पोहोचला थेट तुरुंगात यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आरोपी तरुणाला काही क्रेडिट कार्ड्स आणि लॅपटॉप उपलब्ध करून दिला होता. याच्या अधारे आरोपीनं तुरुंगात बसून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपीनं परदेशातील लोकांची बँक खाती हॅक करून त्यातील रकमेची आफरातफर केली आहे.

त्याने अनेक पंचतारांकीत हॉटेलांना देखील अशाच प्रकारे गंडा घातला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी आरोपीला भोपाळ येथील तुरुंगात हलवलं आहे. किरकोळ कारणातून मालकाची सटकली; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घेतला कामगाराचा जीव अमर अग्रवाल याने ऑनलाइन गंडा घालून हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय पोलिसांना आहे. यातील काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाले तर काही पैसे अमरने स्वतः साठी फिरवल्याचा संशय आहे. बीडमध्येही हवालाचे पैसे आल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!