श्रीराम विद्यालय, देवगाव येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

26 जून 2021 रोजी श्रीराम विद्यालय, देवगाव. येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शासनाच्या परिपत्रकानुसार साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ,श्री. मुरकुटे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला. विद्यालयातील सेवा जेष्ठ शिक्षक, श्री .शेरे सर यांनी गुगल मीटॲप द्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आणि शाहू महाराजांच्या विषयी मार्गदर्शन केले .याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू, भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. शाळा बंद आहे पण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. या माध्यमातून विद्यार्थी अशा कार्यक्रमाला झटपट सहभागी करून घेतले जातात .त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत राहतो .म्हणूनच शाळा बंद च्या काळामध्ये ही विद्यालयात शासनाच्या निर्णयानुसार ही जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी सर्वांचे. आभार श्री वाबळे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!