वनविभागाच्या हलगर्जी पणा मुळे एका हरणाचा मृत्यू

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे एका अज्ञात वाहनाने तीन हरणांना धडक दिल्याने एका हरणाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन हरीण गंभीर जखमी झाल्यात. यावेळी येथील नागरिकांनी वनविभाग दौंड येथील अधिकाऱ्यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. या ठिकाणी वनकर्मचारी जालिंदर झगडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. परंतु वनविभाग या जखमी हरणांना उपचारासाठी वाहन पाठवण्यास असमर्थ ठरल्याचं दिसून आलं. परंतु या ठिकाणी काही हरीण जखमी झाल्याची माहिती मिळताच कुरकुंभ गावचे सरपंच राहुल भोसले यांनी धाव घेत कुरकुंभ ग्रामपंचायतची रुग्णवाहिका उपलब्ध करून या हरणांना स्वता व काही नागरिकांच्या मदतीने हरणांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करून हरणांना उपचारासाठी दौंड येथे पाठवण्यात आले. परंतु या दौंड वनविभागाच्या हलगर्जीपणामूळे एका हरणाचा मृत्यू झालाय याबाबत प्रशासनाने हलगर्जी पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मांगणी येथील ग्रामस्थ करीत आहे. तसेच या परिसरात हरीण ससा असे अनेक वन्य प्राणी या परिसरात वावरत असतात तरी या ठिकाणी वनविभागाने फलक लावावी अशी मांगणी येथील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!