
अवैध वाळू उपसा व वाहतूकिवर दौंड पोलिसांची कारवाई 15 लाख 49 हजार रु चा मुद्देमाल जप्त..
एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई चा धडाका
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
२० डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मलठण गावचे हद्दीतील जाणाईचा ओढा शिवारातील भीमा नदीच्या पात्रात एक इसम फायबर व सेकशन बोटीच्या सहाय्याने चोरून वाळू उपसा करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने दौंड पोलीस स्टेशन व महसूल च्या अधिकाऱ्यांनी असे एकत्रित मिळून मिळाले माहितीच्या ठिकाणी पोहचले असता पोलीसांची चाहूल लागताच वाळू उपसा करणारा एक इसम त्याचे ताब्यातील बोटी नदीपात्रात सोडून पळून गेला.त्या नंतर त्या ठिकाणी मिळून आलेली एक फायबर बोट व एक सेकशन बोट तसेच त्यात मिळून आलेली 5 ब्रास वाळू असा एकूण 10,25,000 रु चा मुद्देमाल जप्त करून त्याचा सविस्तर पंचनामा करून दौंड तहसीलदार यांच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल जागीच नष्ट केला व पळून गेलेल्या इसमाबाबत माहिती घेऊन गोविंद तानाजी वाघमोडे ( रा.मलठन ता. दौंड ) यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रात्री ०३:०० वा च्या सुमारास पोलीस नाईक विशाल जावळे व पो.कॉ गलांडे हे दौंड शहरात बिट मार्शल पेट्रोलिंग ( गस्त) करीत असताना त्यांना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कळविले की सोनवडी गावाकडून दौंड च्या बाजूने एक टाटा एस कंपनीचा वाळूने भरलेला ट्रक येत आहे आपण त्यावर कारवाई करा असे कळविल्याने ते लागलीच त्या ठिकाणी गेले असता सोनवडी बाजूकडून एक ट्रक येताना दिसल्याने त्यांनी त्यास थांबवन्याचा इशारा केला असता सदर ट्रक वरील चालकाने ट्रक रोडच्या कडेला उभा करून ट्रक मधून उडी मारून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला ,त्या नंतर पोलिसांनी ट्रक ची पाहणी केली असता ट्रकचा नंबर MH12 DT 5111 असा असुन त्या मध्ये तीन ब्रास वाळू भरलेली दिसून आली ,त्या नंतर पोलिसांनी सदरचा ट्रक व त्यात मिळून आलेली वाळू असा ऐकून 5,24,000 रु चा मुद्देमाल जप्त करून सदर ट्रक वरील अज्ञात चालक विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा दोन्ही कारवाई मिळून ऐकून 15 लाख 49 हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, पो.ना.विशाल जावळे. पो.ना.किरण राऊत,पो. ना अमोल गवळी, पो.ना आमिर शेख,पो.ना.लोहार, पो.ना.निखिल जाधव,पो.कॉ अमजद शेख,पो. कॉ अमोल देवकाते,पो कॉ गलांडे यांनी केली असून अधिक तपास स.फौ. महेंद्र गायकवाड व पोलिस हवालदार चव्हाण करीत आहेत