
महिला आरोग्यासाठी एक पाऊल पुढे…!
महिला आरोग्यासाठी एक पाऊल पुढे…! विकास गोपाळ आणि प्रिया कड यांनी सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून उचललेले एक पाऊल आदर्श वत ! आजच्या तरुण पिढीने ही प्रेरणा घेणे गरजेचे !
मुंबई:- संजय कदम
देशात आणि राज्यात महिलांच्या आरोग्याबाबत तसे पाहिले तर मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड हा विषय चर्चेचा नाहीच !
त्यामुळे पॅड मधील हानिकारक केमिकल आणि प्लॅस्टिक मुळे मुलींना वयाच्या चौदाव्या , पंधराव्या वर्षा पासून ते चाळीशी पर्यन्त अनेक आजारांना सामोरे जावे लागले, हे सुद्धा अनेक सुशिक्षित घरात माहीत नसलेच, परंतु याबद्दल दोघांची चर्चा होते आणि तेथूनच प्रवास सुरू झाला , विकास गोपाळ आणि प्रिया कड या भावंडाचा आणि उदयास आली WeRmore Solutions Pvt Ltd.
ही कंपनी महिलांना होणाऱ्या मासिक पाळीबद्दल सामाजिक प्रबोधनाचे काम करते.
यामार्फत आपण मार्केट मध्ये मिळणारे सॅनेटरी नॅपकिन आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम, तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्लास्टिक पॅड वापरल्यामुळे त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम या सर्व बाबींबद्दल महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या सॅनिटरी पॅड मध्ये जे घटक वापरले जातात त्यामुळे आपल्याला कशा प्रकारे कॅन्सर किंवा त्यासारखे दुर्लब आजार होऊ शकतात याबद्दल माहिती देण्यासाठी ही कंपनी सुरू करण्यात आली आहे.
कंपनीचे उद्दिष्ट हे महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या पिशवीच्या होणाऱ्या कॅन्सर संदर्भात म्हणजेच Uterus Cancer संदर्भात महिलांना जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि वेळेवर त्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटांपासून वाचता येईल यावरती नियोजन करण्यास मदत व्हावी.
यासाठी विकास गोपाळ आणि प्रिया कड यांनी ही मोहीम एक चळवळ म्हणून सुरू केली आहे . आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यातील सामाजिक संस्थांनी विकास गोपाळ यांना आदर्श व्यावसायिक उद्योजक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तर प्रिया कड यांनाही उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय असा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
विकास आणि प्रिया या दोघांनी महिलांच्या आरोग्याबाबत विशेष मोहीम हाती घेऊन संपूर्ण राज्यात आपल्या सॅनेटरी नॅपकिन चे जाळे विणून ते महिलांपर्यंत पोच करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन सुमारे चार ते पाच हजार महिलांना रोजगार निर्मिती सुद्धा उपलब्ध करून दिली आहे .
यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय उद्योग करून उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त करून देणाऱ्या श्री विकास गोपाळ यांना हजारो महिलांनी महाराष्ट्राचे पॅडमन आशी उपाधी दिली आहे.
मासिक पाळी दरम्यान जे त्रास होतात म्हणजेच अनियमित मासिक पाळी, अतिप्रमाणात उष्णता व संक्रमण, पुरळ येणे जास्त खाज सुटणे, त्या दिवसांमध्ये होणाऱ्या असह्य वेदना तसेच दुर्गंधी येणे , PCOD , PCOS अशा सर्व समस्यां असल्यास काय वापरल्यानंतर आणि कश्या पद्धतीने काळजी घेतल्यानंतर कुठल्याही डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय हे सर्व आजार फक्त पॅड वापरून देखील बरे होऊ शकतात हे महिलांना समजाऊन सांगून हजारो महिलांचे त्रास दूर करण्यात देखील यशस्वी झाले आहेत. आणि सोबतच हजारो महिलांना या माध्यमातून रोजगाराचा येक नवीन पर्याय निर्माण करून देण्यात यशस्वी झाले आहे. यामुळे विविध समाजमाध्यमावरून आणि समाजातील विविध स्तरावरून देखील त्यांचे खूप कौतुक देखील होत आहे.