वनमंत्री संजय राठोड यांचा महाराष्ट्र दौऱ्याला पालघर मधून सुरवात…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्या नंतर,स्वस्थ न बसता संपूर्ण महाराष्ट्रातील गावपाड्यातील तांड्या तांड्यावर जाऊन, समाजाच्या समस्या,जाणून घेऊन,समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे आमदार संजय राठोड महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरवात पालघर येथील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौक येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले त्यानंतर पालघर येथील शासकीय विश्रामगृह येथे समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी पालघर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारण्यात यावा तसेच आपला समाज ज्या सरकारी जागेत वास्तव्य करत आहे त्यांना त्यांची जागा मिळवुन द्यावी,जिल्ह्यात प्रशस्त भवन निर्माण व्हावे, नाका कामगारांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, नाका कामगार यांच्या महामंडळ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या नोंदणी करतांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशा अनेक बंजारा समाजाच्या समस्या राष्ट्रीय बंजारा टायगर्स महाराष्ट्र प्रदेश समन्वयक रवी राठोड यांनी मांडल्या समाजाचा समस्या ऐकून घेतल्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या भाषणात मी तुमच्या सोबत आहे तुम्ही माझ्या बदनामीच्या वेळी माझा सोबत होते तर मी कोरोना च्या वेळेस तुमच्या सोबत असणार आहे असे आश्वासन राठोड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले
आमदार संजय राठोड सोमवार रोजी पालघर दौऱ्या दरम्यान कोरोनाच्या नियमांचे सर्व पालन करा असे आवाहन बंजारा समाजाला यावेळी सांगितले जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा समन्वय समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेऊन,कोरोना काळात मजूरी करणारे जिल्ह्यातील बंजारा समाजाचे नागरीक व तांड्यातील समस्यां जाणून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केल्या जाणार आहे पोहरागड येथे होणाऱ्या नंगारा संग्रहालयासाठी आवश्यक असणाऱ्या समाजातील दुर्मीळ, वस्तू,दस्तावेज,चलचित्रांचे संकलन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील बंजारा बहूल मतदारसंघ तसेच प्रमुख तांड्याना भेटी देणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील दौरा आढावा घेऊन नंगारा संग्रहालयाची अंतर्गत बाबी निश्चित करणे व प्राप्त समस्यांवर राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडविन्यायासाठी आमदार संजय राठोड प्रयत्न करणार आहेत असे पत्रकारांना बोलताना सांगितले यावेळी दौऱ्यावर असताना अचानक एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला व दौरा दरम्यान बंजारा समाजातील एका गरीब कुटूंबातील लग्न असल्याचं कळल्यानंतर भेट देऊन शुभेच्छा आमदार संजय राठोडयांनी दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!