बदलत्या जागतिकीकरणात वाणिज्य शाखेत मोठ्या संधी-प्राचार्य संजय चेमटे

  • शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख.
    आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथे कॉमर्स अकॅडमी तर्फे विद्यार्थी-पालक व शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड व सौ. मंदाकिनी भालसिंग, समन्वयक अनिल जगताप सर,श्री.गायके सर, वडुले गावचे सरपंच श्री.प्रदीप काळे, श्री.संभाजीराव पायघन, सौ.जयश्री आहेर इत्यादी पालक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य चेमटे म्हणाले की, आर्थिक उदारीकरणाच्या नवीन जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रातही नवी लाट येत असून वाणिज्य शाखेत मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विद्याधरजी काकडे साहेब यांच्या विचारप्रेरणेतून विद्यार्थ्यांकरीता कॉमर्स अकॅडमी या कोर्सची इ.८वी पासून सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्थव्यवहार समजावेत यासाठी पालकांनी मुद्दामहून प्रयत्न करणे आवश्यक आहे. याप्रसंगी समन्वयक जगताप सर यांनी कॉमर्स फाऊंडेशन या शाखेतील अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थी पालकांना माहिती दिली तर विविध क्षेत्रातील अर्थविषयक कौशल्ये श्री गायके सर यांनी स्पष्ट केली. सदर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, इ.८वी व इ.९वीचे विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शीला धिंदळे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप करताना श्रीमती रागिनी लबडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!